
मिलिंद सोमणने केले Japanese Forest Bathing! हा प्रकार- फायदे जाणून घ्या
मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसने सर्वांनाच प्रेरणा देतो. कोणत्याही वयात व्यायाम केल्याने तंदुरूस्त राहता येते हे त्याच्याकडे बघून शिकायला मिळले. मिलिंद सोमण व्यायामाच्या (Exersice) फायद्यांबद्दल नियमित इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. पण आता त्याने प्राचीन जपानी तंत्रद्वारे कसे तंदूरूस्त राहता येईल ते सांगितले आहे. या व्यायामामुळे तो शरीर (Body) आणि निसर्गाला एकत्र जोडू शकतो. हे तंत्र आहे फॉरेस्ट बाथिंग नावाचा जपानी प्रकार. त्याला 'शिनरीन योकू' असेही म्हणतात. मिलिंद अकिंतासह गुजरातमध्ये (Gujrat) गेला होता. इंस्टाग्रामवर त्याने गुजरातमधील जंगलात धावतानाचे (Running) फोटो शेअर केले. त्यात त्याने शिनरीन-योकू किंवा फॉरेस्ट बाथिंगच्या जपानी तत्त्वज्ञानाविषयी खुलासा केला.
हेही वाचा: व्यायामाच्या आधी अन् नंतर किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत
या पोस्टमध्ये मिलिंद लिहितो, देविनामल इको कॅम्प साइटमधील आसपासच्या जंगलात , चालणे, बसणे, उभे राहणे, श्वास घेणे ही भावना फार छान आहे. शिनरीन-योकू, किंवा फॉरेस्ट बाथिंग या जपानी तत्त्वज्ञानात, जंगलात राहून आपण आणि निसर्गातील दरी कमी करण्यास मदत करते. तसेच आपल्याला नैसर्गिक गोष्टींशी जोडण्यास मदत करते. कारण निसर्गामुळे निरोगी राहणे हे अत्यंत सोपे आणि सुंदर आहे, असे मिलिंद लिहितो.
हेही वाचा: चाळीशीनंतर १० मिनिट व्यायाम केल्यास व्हाल दिर्घायुषी! अभ्यासातील निष्कर्ष
फोरेस्ट बाथिंग किंवा 'शिनरीन योकू म्हणजे काय? (What Is Shinrin-Yoku Or Forest Bathing?)
शिनरीन योकू किंवा फॉरेस्ट बाथिंगला फॉरेस्ट थेरपी असेही म्हणतात. म्हणजे एखाद्याने जंगलातील वातावरणाचा सर्वार्थाने आनंद घेणे. ही एक माईंडफुलनेस थेरपी आहे. ती १९८० च्या सुमारास जपानमध्ये उदयास आली. याचा अर्थ म्हणजे जंगलात फक्त चालणे किंवा धावणे असे नाही. तर, त्यापुढे जात हा शारीरिक आणि मानसिक व्यायाम आहे. एखाद्याचे आरोग्य सुधारण्यासाठी हवाबदल चांगला ठरतो. मात्र या पद्धतीत जंगलातील दृष्ये, आवाज आणि वासामुळे एखाद्याच्या आरोग्यात चांगले बदल होऊ शकतात. निसर्गात वेळ घालविल्याने आरोग्य चांगले राहते किंवा तो वेळ आपल्यासाठी शिकवणारा असतो, अशाप्रकारे विज्ञान या गोष्टीचे समर्थन करते.
हेही वाचा: व्यायाम- खाण्यादरम्यान नेमकं किती अंतर असावं? जाणून घ्या
Web Title: Milind Soman Share Japanese Forest Bathing Shinrin Yoku Health Benefits
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..