esakal | सौम्य लक्षणं असतील करू नका या चुका; अन्यथा कोरोना घेईल गंभीर रूप
sakal

बोलून बातमी शोधा

सौम्य लक्षणं असतील तर करू नका या चुका; अन्यथा कोरोना घेईल गंभीर रूप

सौम्य लक्षणं असतील तर करू नका या चुका; अन्यथा कोरोना घेईल गंभीर रूप

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे तरुण आहेत. त्याचबरोबर लहान मुलांमध्येही कोरोनाची (Corona in Young people) लक्षणं आढळतात आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे तरुणांकडून करण्यात येणारं दुर्लक्ष. मात्र याचमुळे कोरोना रुग्ण गंभीर होऊ शकतात. म्हणूनच या चुका अजिबात करू नका आणि कोरोना गंभीर रूप धारण करण्यापासून परावृत्त करा. (Mistakes which brings corona at dangerous stage from mild stage)

हेही वाचा: अखेर नागपूर महापालिकेला सुचलं शहाणपण! खाजगी रुग्णालय बिलासंदर्भात समिती स्थापन

False Negative पासून सावधान

कोरोनावर मात करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्यवेळी निदान आणि त्यावरील उपचार. आजकाल false निगेटिव्हमुळे अनेक रुग्णांना भयन्कर परिणामांचासामना करावा लागू शकतो. त्यामुळे जर कोरोना निगेटिव्ह आली आणि तरीही लक्षणं असतील तर त्वरित डॉक्टरांशी बोला, त्यांचा सल्ला घ्या. कारण योग्यवेळी निदानच महत्वाचं आहे.

म्हणून गंभीर रूप घेतो कोरोना

सुरुवातीला काही सौम्य लक्षणांपासून कोरोनाची सुरुवात होते. मात्र शरीरातील काही गंभीर आजारांमुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना व्हायरस गंभीर रूप घेतो. हॅपी हायपॉक्सिया आणि इतर काही आजारांमुळेही तरुण पिढी मृत्यूच्या दाढेत ढकलली जातेय. म्हणूनच पहिल्या दिवसापासून रूग्णांनीही त्यांच्या कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही खबरदारीची खबरदारी घेतली पाहिजे, असंही डॉक्टरांचं मत आहे.

दुर्लक्ष पडू शकतं महागात

कोरोना गंभीर रूप घेण्यामागे दुर्लक्ष करणं हे एक कारण आहे. अनेकदा आपल्याला अनेक सौम्य लक्षणं असूनही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा तर वातावरणामुळे ही लक्षणं असतील असा समज आपण करून घेतो. मात्र अतिदुर्लक्ष महागात पडू शकत. यामुळे कोरोना रुग्ण गंभीर होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे कोरोनाच्या सौम्य, अतिसौम्य आणि गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

सुरुवातीलाच स्टिरॉइड्स घेऊ नका

अनेकदा गंभीर कोरोना रुग्णांना स्टिरॉइड्स देण्यात येतात. एक प्रकारचा उपचार म्हणून हे स्टिरॉइड्स देण्यात येतात. मात्र हे स्टिरॉइड्स सर्वच रुग्णांना देण्यात येत नाहीत. सर्व कोव्हिड प्रकरणांमध्ये स्टिरॉइड्स वापरण्याची आवश्यकता नाही. अंधाधुंध वापर, किंवा सौम्य संसर्गामध्ये वापरल्याने अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे सौम्य लक्षणं असल्यास लगेच स्टिरॉइड्स घेण्यास सुरुवात करू नका. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

वेळीच डॉक्टरांचा सल्ला न घेणे

कोरोनाची सौम्य, अतिसौम्य किंवा गंभीर असे कुठलेही लक्षणं असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास सौम्य लक्षणं गंभीर होऊ शकतात. लक्षणं जरी अगदी सौम्य किंवा इतर सर्दी -खोकल्यासारखे वाटत असतील तरीही डॉक्टरांकडे नक्की जा. यामुळे तुम्हाला कोरोनाचं योग्य निदान वेळेत मिळेल. डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका.

चाचणीसाठी उशीर

अनेकदा आपल्याला वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला किंवा ताप अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मात्र आता ही लक्षणं साधीसुधी राहिली नाहीत. हीच कोरोनाची लक्षणंही आहेत. त्यामुळे अशी कुठलीही लक्षणं आढळल्यास सर्वात आधी कोरोनाची चाचणी करून घ्या. योग्य वेळी निदान झाल्यास गंभीर परिणाम होणार नाहीत. तसंच चाचणी पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरणात राहा.

कोरोना चाचण्यांच्या रिपोर्टसाठी विलंब

अनेकदा तुम्ही चाचणी केल्यानंतरही रिपोर्ट येण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र त्यापेक्षा अधिक उशीर होऊ देऊ नका. तुमच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट त्वरित मिळवा. विलंब होत असल्यास त्या काळात विलगीकरणातच राहा. यामुळे तुमच्यामुळे इतर लोकांना कोरोनाची लागण होणार नाही.

हेही वाचा: Lockdown Effect : नागपुरात ओसरतेय कोरोनाची दुसरी लाट.. ही पाहा आकडेवारी

(Mistakes which brings corona at dangerous stage from mild stage)

loading image
go to top