गुटगुटीत बाळाच्या आरोग्याचं गुपित; मूगडाळच्या खिचडीचे असंख्य फायदे

mug dal khichdi
mug dal khichdi

नवी दिल्ली : नुकत्याच जन्मलेल्या बाळाला 6 महिन्यांपर्यंत तरी आपल्या आईचंच दुध प्यायला हवं. कारण आईच्या दुधात बाळाला आवश्यक असणारे सगळे पोषक तत्त्व असतात. मात्र 6 महिन्यांनंतर बाळासाठी आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीतरी ठोस आहाराची सुरवात करायला हवी. कारण, बऱ्याच वेळेला फक्त आईचं दुध बाळासाठी पुरेसं नसतं. तर त्याव्यतिरिक्त अनेक पोषक घटकांची बाळाच्या शरिराला आवश्यकता असते. लहान बाळांना योग्य पोषण आवश्यक असतेच. मात्र जे त्यांना खायला घातलं जातंय, त्याचा देखील बाळांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. अनेक बाळांना आहाराच्या अयोग्य सवयींमुळे बद्धकोष्टता अथवा पोटाच्या समस्या होतात. याप्रकारच्या समस्यांना निपटण्यासाठी मुलांना मुगाच्या डाळीची खिचडी देणं, हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ही खिचडी 4 महिन्यांच्या बाळाला देखील दिली जाऊ शकते. अशी आहे दालखिचडी बनवण्याची पद्धत...

दाल खिचडीसाठीचे साहित्य
ही खिचडी बनवण्यासाठी आपल्याकडे हवे तीन मोठे चमचे तांदूळ, चार मोठे चमचे डाळ, थोडेसे कापलेले गाजर, थोडासा भोपळा, आणि थोडासा पालक. डाळ आणि तांदळाच्या प्रमाणानुसारच या भाज्यांचे प्रमाण असावे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडाशी हळदही लागेल.

मुलांसाठी मूगडाळ खिचडी बनवण्याची रेसिपी

  • सर्वांत आधी तांदूळ आणि डाळ यांना धुवून घ्या.
  • धुतल्यानंतर त्यांना कूकरमध्ये ठेवा. त्यावर सर्व भाज्या टाका.
  • एक कप पाणी घ्या. मग थोडाशी हळद आणि मीठ टाका.
  • या सर्व साहित्य चांगल्या पद्घतीने मिक्स करा. त्यानंतर आता या मिश्रणाला गॅसवर धीम्या आचेवर ठेवा.
  • पाच शिट्ट्या होईपर्यंत याला शिजवा. कूकर थंड होईपर्यंत वाट पहा.     
  • वाफ निघून गेल्यावर कूकर उघडा. खिचडी तयार आहे. 
  • चार महिन्याच्या बाळासाठी खिचडी चारताना ती थोडी आणखी बारिक करा जेणेकरुन बाळाला खायला सोपे पडेल.


मुलांसाठी मूगडाळच्या खिचडीचे फायदे
मूगडाळच्या खिचडीमध्ये तांदुळ, डाळ आणि भाज्यांचा वापर केला जातो. यामध्ये शरिरासाठी आवश्यक सगळे पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे बाळाला उर्जा प्राप्त होते.
चार महिन्याचे बाळ देखील मूंगदाल ची खिचडी सहजतेने पचवू शकते. हे पचवणं बाळासाठी अगदी सोपं असतं. ही खिचडी बाळाच्या पचन क्षमतेत वाढ करते. त्यामुळेच पोटाची समस्या उद्भवली की लोकांना मूगडाळची खिचडी दिली जाते.  खिचडी खाल्ल्याने बाळाच्या पोटात दुखत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गर्भवती महिलेला देखील ही खिचडी दिली जाते. जेणेकरुन त्यांना बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. 

बाळाला का द्यावी मूगडाळची खिचडी
कमकुवत बाळांना मूगडाळीची खिचडी जरुर खायला घातली पाहिजे. यामुळे मुलांमधील कमजोरी दूर होऊन ते स्ट्राँग बनतात. जर मुले आजारी असतील तर ही खिचडी त्यांना दिली जाऊ शकते. यामुळे मुलाचे वजन देखील संतुलित राहते. जर आपल्या मुलाला अन्न पचवणे जड जात असेल तर त्याला  बारिक केलेली खिचडी खायला घाला. जेणेकरुन ती त्याला पचेल. सोबतच बाळाची  पोटाची समस्या देखील मिटेल. बाळाला ताप आला असेल तरी देखील ही खिचडी त्याला खायला दिली जाऊ शकते. यातील सर्व पोषक तत्त्वांनी बाळाची तब्येत लवकर बरी होते तसेच रोगापासून वाचण्याची प्रतिकार शक्ती देखील बाळाची पटकन वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com