योग- जीवन : चतुरंगदंडासन

आजच्या लेखात आपण पतंजलींच्या योगदर्शनाच्या तिसऱ्या पादाची, अर्थात ‘विभूतीपादा’ची ओळख करून घेणार आहोत.
chaturanga dandasana
chaturanga dandasanasakal
Summary

आजच्या लेखात आपण पतंजलींच्या योगदर्शनाच्या तिसऱ्या पादाची, अर्थात ‘विभूतीपादा’ची ओळख करून घेणार आहोत.

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आजच्या लेखात आपण पतंजलींच्या योगदर्शनाच्या तिसऱ्या पादाची, अर्थात ‘विभूतीपादा’ची ओळख करून घेणार आहोत. या पादामधे, योगशास्त्रात नैपुण्य मिळवल्यावर साधकाला कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात आणि त्यातून काय काय अडथळे निर्माण होऊ शकतात याची कल्पना पतंजली महामुनी देतात. अंतरंग साधनेच्या ३ पाकळ्या आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी. या तिन्ही अंगांवर प्रभुत्व मिळवून साधक जेव्हा त्यांची प्रभावी सांगड घालतो, तेव्हा त्याला संयम अवस्था लाभते. पतंजली असे सुद्धा नमूद करतात, की संयम अवस्था लाभण्यासाठी बहिरंग साधनेत काबीज केलेल्या आधीच्या ५ अंगांवरची पकड सैल करून चालत नाही. 

या संयम अवस्थेतून चित्त प्रसन्न अवस्थेत प्रवेश करते आणि समाधीची पूर्वतयारी पूर्ण होते. या नंतर पतंजली संयमावस्था व त्यातून प्राप्त होणाऱ्या फळांचा उल्लेख करता. यातून साधकाला भूत आणि भविष्य काळाचे ज्ञान प्राप्त होते, सर्व प्राणिमात्रांच्या आवाजातून त्यांच्या भावना काळायला लागतात, दुसऱ्यांच्या मनातले विचार कळायला लागतात, पूर्व जन्माचे ज्ञान प्राप्त होते,

आपल्या आजूबाजूचा प्रकाश शोषून घेऊन साधक स्वत-ला अदृश्य करू शकतो, त्याला हत्तीचे बळ प्राप्त होते, संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातल्या सर्व ग्रहांची रचना समजते, संपूर्ण शरीर रचनेचे ज्ञान प्राप्त होते, भूक आणि तहानेवर ताबा मिळवून शरीरातल्या सगळ्या क्रिया स्थिर करायची कला त्याला अवगत होते.

या अवस्थेत प्रकृती आणि परमात्म्याचा एकरुपत्वाचा प्रत्यय त्याला होतो आणि हे एकरुपत्व तो समजायला लागतो. या सगळ्या आश्चर्यकारक सिद्धींची कल्पना दिल्यावर, पतंजली साधकाला सावध करतात की, यांच्या जाळ्यात गुंतून जाऊ नकोस. ते साधकाला सल्ला देतात, की ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन तुला कैवल्यापर्यंत पोचायचे आहे. तेव्हा भरकटला जाऊ नकोस. ते म्हणतात ही पायरी ओलांडल्यावर विवेकातून जन्मलेले विवेकज्ञान प्राप्त होऊन, तो देदीप्यमान आत्म्याचा प्रखर प्रकाश झेलण्याची क्षमता प्राप्त करतो. या नंतर अध्यात्माचे ज्ञान मिळवून साधक कैवल्यावस्थेत पोचतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com