मल्टीपल स्क्लेरॉसिस म्हणजे काय?

थकवा,दृष्टीदोष यांकडे करु नका दुर्लक्ष
Brain
Brain

गेल्या काही काळात मल्टिपल स्क्लेरॉसिस (multiple sclerosis) या आजाराविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मेंदूशी निगडीत या आजाराबद्दल फारशी कोणाला जाण नसल्यामुळे अनेक जण किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच हेच आजार पुढे रौद्ररुप धारण करतात. म्हणूनच मल्टिपल स्क्लेरॉसिस म्हणजे काय? त्याची कारणे व उपाय कोणते ते पाहुयात (multiple-sclerosis-symptoms-and-causes)

मल्टिपल स्क्लेरॉसिस(एमएस) म्हणजे मेंदूतील चेतापेशींच्या काठिण्याचा रोग. याला आँटो इम्यून आजार असंही म्हटलं जातं. एखादी व्यक्ती जनुकीयदृष्टया नाजूक असेल, शरीरात जीवनसत्वांचे प्रमाण कमी असेल किंवा विषाणू आणि पर्यावरणीय घटकांचा परिणाम यामुळे हा विकार जडू शकतो. या विकारामुळे मज्जातंतूंभोवती असलेल्या संरक्षक कवचावर परिणाम होतो. परिणामी मज्जासंस्था शरीराला संदेश पाठविण्याचे कार्य करू शकत नाही.

Brain
कोविड रुग्णांचा आहार कसा आसावा? घ्या 'ही' काळजी

एमएसचे चार प्रकार आहेत यामध्ये रिलेप्सिंग-रेमिटिंग एमएस, सेकंडरी प्रोग्रेसिव्ह एमएस, प्राइमरी प्रोग्रेसिव्ह एमएस आणि प्रोग्रेसिव्ह-रिलेप्सिंग एमएस यांचा समावेश आहे.

मल्टिपल स्क्लेरॉसिसची लक्षणे

थकवा येणे, दृष्टीदोष, हातापायाला मुंग्या येणे वा बधीर होणे, उंचीची भीती वाटणे, चक्कर येणे, स्नायू अशक्त होणे आणि गोळे येणे, तोल आणि समन्वयाशी निगडीत समस्या ही मल्टिपल स्क्लेरॉसिसची मूळ लक्षणे आहेत. तसंच अस्पष्ट उच्चार, अन्न गिळताना त्रास होणे , आकलनक्षमतेवर परिणाम, चालताना त्रास होणे, मलमूत्रविसर्जनाच्या समस्या, स्वभावातील चढउतार किंवा नैराश्य ही लक्षणेसुद्धा आढळतात.

स्क्लेरोसिसची कारणे

खासकरुन हा आजार २० पेक्षा कमी व ५० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. तसंच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. धूम्रपान, लठ्ठपणा आणि आनुवंशिक यामुळे हा आजार होत असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे.

उपचार

मल्टिपल स्क्लेरॉसिस झालेल्या रुग्णावर बहुधा इम्युन-सप्रेसिव्ह औषधे आणि मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या सहाय्याने उपचार करण्यात येतात. पण ही औषधे जास्त कालावधीपर्यंत वापरता येत नाही. दिर्घकाळ या औषधांचा वापर केल्यास त्यामुळे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. त्यामुळेच यावर सेल्युलर थेरपी, स्टेम सेल या उपचार पद्धतीने उपाय करता येऊ शकतात. तसंच ऑटोलॉगस पेशीवर आधारित थेरपीमध्ये रुग्णाच्या स्वत:च्या शरीरातील स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण करण्यात येते, ज्याने प्रतिकारक क्षमता पुनस्र्थापित होते.

ऑटोलॉगस स्टेम सेल -

ऑटोलॉगस स्टेम सेल या न्यूरोप्रोटेक्टिव्ह असतात आणि त्यात पॅराक्राईन गुणधर्मसुद्धा असतात. ज्यामुळे, मल्टिपल स्क्लेरॉसिस असलेल्या रुग्णांना लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे, स्टेमसेलमध्ये असलेल्या प्रतिकारक्षमता व्यवस्थापनाच्या गुणधर्मामुळे मल्टिपल स्क्लेरॉसिस झालेल्या रुग्णांच्या केंद्रीय चेतासंस्थेला झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, अपाय झालेल्या मज्जातंतूची पुनर्निर्मिती करण्यास मदत करतात. रुग्णांना बरे होण्यास लागणारा कालावधी २ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंतचा असू शकतो. स्टेमसेल शरीरात कार्यरत करण्यासाठी विविध मार्ग आहेत, रुग्णाची परिस्थिती आणि आवश्यकता यावर हा मार्ग अवलंबून असतो. चेतासंस्थेच्या विकारामध्ये ज्या मार्गाने पेशी मेंदूपर्यंत पोहोचविता येऊ शकतात, तो मार्ग योग्य मार्ग असतो.

जीवनशैलीत करा 'हा' बदल

एमएसला रोखता येत नाही. परंतु, लवकर निदान आणि वेळीच उपचार घेऊन तीव्रता कमी करता येऊ शकते.

चुकीच्या आहारपद्धतीत बदल करा

बदल आणि मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळा.

रूग्णांना अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध आहार घ्यावा.

आहारात ब्रोकोली, फ्लॉवर सारख्या भाज्यांचा समावेश करा.

पॅकेज फूड, प्रिझर्व्हेटिव्हज, साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.

नियमित व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे.

(लेखक डॉ. प्रदीप महाजन हे स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्यूशन्स प्रा. लि. येथे रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com