
मुंबई, 24 : टीबी रुग्णांसाठी वापरण्यात येणारी ओझोन थेरपी ही आता कोविड रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोविड आणि क्षयरोगामधून झटपट रिकव्हरीसाठी डाॅक्टरांनी ओझोन थेरपीची शिफारस केली आहे.
ओझोन थेरपी शरीरातील अँटीऑक्सिडंट वाढवते आणि कोव्हिड-19 वर उपचार म्हणून तसेच रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. चाचणीमध्ये सिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोव्हिड-19 च्या उपचारांसोबत ओझोन थेरपीचा वापर केल्यास रुग्ण लवकर म्हणजे अगदी 5 ते 8 दिवसांमध्ये बरे होतात. कोव्हिड -19 पुन्हा होण्याचा धोका कमी करते आणि श्वासोच्छवासाला त्रास, थकवा, कमजोरी, फुफुसांचे सशक्तीकरण, रक्ताच्या गुठळ्या होणे आदी कोव्हिड-19 नंतरच्या तणावांपासूनही रुग्णांची सुटका करते.
मुंबई पालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयात टीबी रुग्णांसाठी ही थेरेपी वापरली जाते. ज्याचा फायदा रुग्णांनाही झाला आहे. त्यानंतर आता कोविड रुग्णांसाठी ही ही थेरेपी वापरुन जास्तीत जास्त रुग्णांना बरे करता येईल असा विश्वास ड्रग रिझिस्टंटमधील स्पेशालिस्ट आणि क्षयरोग व अँटी ऑक्सीडेन्ट थेरपिस्ट डाॅ. ललित कुमार आनंदे यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाची बातमी : कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी हाफकिन स्थापन करणार प्रयोगशाळा
ओझोन थेरेपीचा फायदा -
बिस्लेरी इंटरनॅशनलच्या बिस्लेरी चॅरिटेबल ट्रस्टच्या कल्पनेतून ओझोन फोरम ऑफ इंडिया आकाराला आला असून या फोरमकडून कोव्हिड-19 त्यानंतरच्या काळात रुग्णांना वेगाने बरे होण्यात मदत करण्यासाठी एका परिणामकारक उपायाची घोषणा करण्यात आली आहे. 2020 च्या मध्यात 500 रुग्णांवर (सहआजार असलेल्यासह) वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यापैकी 77 टक्के रुग्ण 5 दिवसांत बरे झाले, तर, अन्य रुग्ण 8 दिवसांत बरे झाले.
"क्षयरोगामध्ये फुफुसावर घातक अदृश्य परिणाम होतात, अनेकदा छातीत पू होतो. त्यामुळे नैराश्यही येऊ शकते. अशा वेळी ओझोन थेरपी ही फारच उपयुक्त आहे."
- डाॅ. ललित कुमार आनंदे, ड्रग रिझिस्टंटमधील स्पेशालिस्ट आणि क्षयरोग व अँटीऑक्सिडेंड थेरपिस्ट
रक्तवाहिन्यांशीसंबंधीत विकार असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, थ्रोम्बोसिस, डोकेदुखी, फुफुसाला संसर्ग, अंगदुखी आणि श्वसनात अडचणी असे प्रकार उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी ओझोन थेरपी संसर्ग नियंत्रित करण्यात फारच प्रभावी आहे. कोव्हिड-19 नंतर ओझोन थेरपीची 15 सत्र करावीत, अशी शिफारस डाॅक्टरांनी केली आहे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि रुग्णाच्या शरीरात अँटीऑक्सिडंट पुन्हा वाढीस लागून आजारामुळे कमी झालेली शक्ती पुन्हा मिळते.
ओझोन फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि बिस्लेरी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डाॅ. मिली शहा यांच्या मते, अधिकाधिक डाॅक्टर आणि रुग्णांपर्यंत या थेरपीची माहिती पोचवण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे. आतापर्यंत आम्ही देशभरातील सुमारे 2400 डाॅक्टरांपर्यंत पोहोचलो आहोत आणि ते या थेरपीचा वापर करत आहेत.
ozone therapy helpful for corona and TB patients read how it is helpful to patents
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.