
या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या सामानाची तपासणी केली असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या ट्रॉलीमध्ये एक चोर कप्पा आढळून आला
मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने मुंबई आंतराष्ट्रीय विमातळावर केलेल्या कारवाईत परदेशी महिलेला तीन किलो हेरॉईन नामक ड्रग्स सोबत अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत तब्बल नऊ कोटी रुपये आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
महत्त्वाची बातमी : मुंबई पालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील कोविड लसीकरणाला सुरुवात कधी?, जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर महिला ड्रग्सचा साठा घेऊन मुंबई विमातळावर येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचे पथक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवून होते. गुरूवारी मिळालेल्या माहितीशी साधर्म्य असलेली महिला दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून आली.
या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या सामानाची तपासणी केली असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या ट्रॉलीमध्ये एक चोर कप्पा आढळून आला आणि तो चोर कप्पा उघडला असता त्यात दोन पाकीटे सापडली. त्यानंतर तिच्याकडील दुदुसऱ्या बॅगेची पडताळणी केली असता त्यातही एक संशयास्पद पाकीट सापडले.
महत्त्वाची बातमी : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे वर्ग बंदच, ऑनलाईन शिक्षणावर भर
तपासणीत ते हेरॉईनच असल्याचे निष्पन्न झाले. या दक्षिण अफ्रिकी महिलेकडून आतापर्यंत दोन किलो 960 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली असून खाणीयसिले प्रॉमिसे खालिशवायो असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती दक्षिण अफ्रिका देशाची नागरिक आहे. सदर महिला दोहा मार्गे जोहान्सबर्ग येथून मुंबईत आली होती. तिच्याकडून 10 हजार अफ्रिकी चलनही जप्त करण्यात आले आहे.
south African women caught with illegal powder on mumbai international airport arrest by NCB