esakal | स्नायूदुखीने त्रस्त आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच | Muscle Soreness
sakal

बोलून बातमी शोधा

Muscle Soreness

स्नायूदुखीने त्रस्त आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच अधूनमधून स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. स्नायूंमध्ये आलेली जोरदार कळ प्रचंड वेदनादायक ठरते. हात किंवा पायांमध्ये या वेदना जाणवतात. या वेदना आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. सततची दगदग, धावपळ किंवा तीव्र स्वरूपाच्या व्यायामामुळे या वेदना जाणवतात. काही वेळा या वेदनांचे इतर कारणे असतात.

स्नायूदुखी तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते. स्नायूदुखीची लक्षणे प्रामुख्याने स्नायुदुखीच्या कारणांवर अवलंबून असतात. स्नायुदुखीचे सामान्यतः काही दिवसांतच स्वतःहून निराकरण होते. दीर्घकालीन स्नायुदुखीचे कारण अंतर्भूत अस्वस्थता असू शकते. मुरगळ आल्यामुळे आणि स्नायू ताणल्याने होणाऱ्या स्नायुदुखीवर उष्ण गाद्यांनी शेकणे, विश्रांती घेणे यासारख्या घरगुती उपायांचा वापर करून उपचार केला जाऊ शकतो. कोणत्याही गंभीर आजाराशिवाय अचानक ही समस्या डोके वर काढते. वेदना सुरू झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा.

हेही वाचा: तुमच्या या सवयी ठरू शकतात डिप्रेशनला कारणीभूत

पाण्याची कमी

पाण्याची कमतरता हे सुद्धा स्नायूंच्या दुखण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. पाणी हा शरीराला अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता तुमचे आरोग्य बिघडवू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, थकवा तसेच इतर समस्या जाणवू शकतात.

झोप

सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने झोप अत्यावश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे अंगदुखी व स्नायूदुखी जाणवू शकते. आपल्याला शांत झोप लागली असली तरी शरीराचे काम सुरूच असते. झोपेच्या काळात स्नायूंची झीज भरून निघत असते. स्नायूंना नवी ऊर्जा प्राप्त होत असते.

अतिताण

अतिताण हे स्नायूंमधल्या वेदनांचे कारण असू शकते. यावर कदाचित कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. ताणतणावाचा संबंध मानसिक आरोग्याशी जोडला जातो. परंतु, याच ताणामुळे स्नायूंचे दुखणे उद्भवू शकते. स्ट्रेस हार्मोन्समुळे शरीर व्याधींचा मुकाबला करू शकत नाही. तणावाखाली असणाऱ्या माणसांची दमछाक होते. तसेच दाहामुळे स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. त्यामुळे खूप ताण आल्यावर अंग दुखू लागते.

हेही वाचा: निर्जनस्‍थळी पोत्‍यामध्ये आढळला मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

पोषक घटक

शरीराला कार्य सुरू ठेवण्यासाठी विविध पोषक घटकांची आवश्यकता असते. या पोषक घटकांमुळे मेंदू तल्लख होतो. हाडं बळकट होतात आणि शरीर निरोगी राहते. एखाद्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये वेदना जाणवू शकतात.

‘ड’ जीवनसत्त्व

स्नायूंच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. सूर्यप्रकाश हा ‘ड’ जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे. स्नायूंच्या दुखण्यामागे इतरही काही कारणे असू शकतात. अँनिमिया, आर्थरायटिस, ल्युपिस अशा काही कारणांमुळे स्नायूंमध्ये वेदना जाणवू शकतात. स्नायूंमधल्या वेदना बराच काळ जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे होऊन जाते.

loading image
go to top