सावधान! सर्वात सुरक्षित वाटणारा मास्क आहे धोकादायक

mask with volve
mask with volve
Updated on

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखण्याचं आवाहन केलं जातंय. याशिवाय बाहेर फिरताना मास्कचा वापर करा असंही सांगितलं जात आहे. कोरोनाच्या या काळात बाजारातही वेगवेगळे मास्क उपलब्ध झाले आहेत. यामध्ये एन 95 मास्क सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर त्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. किंमत जास्त असुनही सर्व सामान्य लोक याची खरेदी करू लागले. दरम्यान, पाटलीपुत्र मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एन 95 या फिल्टर असलेला मास्क घातल्यावरही कोरोनाच्या संसर्गाची शक्यता असते. यापेक्षा ट्रिपल लेअर मास्क सुरक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा फिल्टर असलेल्या मास्कपेक्षा ट्रिपल लेअर मास्क चांगला असल्याचं सांगितलं आहे. याबद्दल आरोग्य संघटनेनं आदेशही जारी केला आहे. 

कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर बीपी भूषण यांनी सांगितलं की, एन 95 मास्क मध्ये व्हॉल्व असतो तो प्रदुषणापासून वाचण्यासाठी असतो. यामुळे याला एन 95 नव्हे तर रेस्पिरेटर असं म्हटलं जातं. रेस्पिरेटरचं काम प्रदुषण आणि विषारी वायूंपासून वाचवणं हे असतं. एन 95 मास्क घालणारा व्यक्ती सुरक्षित राहतो मात्र त्याच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका कमी होत नाही. कारण हा मास्क बाहेरून येणारी हवा फिल्टर करतो पण उच्छ्वासावाटे सोडली जाणारी हवा थेट बाहेर फेकतो. यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीच्या एरोसोलमुले दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. 

एन 95 मास्क पाच लेअरचा असतो आणि यात व्हॉल्व लावलेला असतो. याच्या बाहेरच्या लेअरला हायड्रोफोबिक लेअर म्हटलं जातं. यामुळे ओलसरपणा कमी करत नाही. त्याच्या आत असलेल्या हायड्रोफिलिक लेअर ओलसरपणा शोषून घेतो. मधल्या लेअरला मेल्ट ब्लोन असं म्हटलं जातं. यातून हवा फिल्टर केली जाते. यामध्येच व्हॉल्वही लावलेला असतो. मास्क घालणाऱ्या व्यक्तीच्या निच्छ्वासातून बाहेर फेकली जाणारी हवा थेट बाहेर पडते. त्यामुळेच संसर्ग झालेल्या व्यक्तीने असा मास्क घातला तर त्यातून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टास्क फोर्सच्या समितीचे सदस्य एन 95 मास्कबाबत सर्व्हे करत आहेत. यामध्ये असं आढळलं आहे की संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये व्हॉल्वचे मास्क घातलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या बरीच होती. जिल्ह्यातील कोविड 19 च्या रुग्णांवर उपचारासाठी असणारे डॉक्टर आणि कर्मचारी एन 95 मास्कसह ट्रिपल लेअर मास्कचाही वापर करत आहेत. एका डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी असं केलं जात आहे.

डॉक्टर भूषण यांनी सांगितलं की, ट्रिपल लेअर मास्कमध्ये तीन लेअर असतात. सर्वात महत्वाची म्हणजे हा मास्क थेट नाक आणि तोंड झाकतो. यात कोणत्याही प्रकारचा व्हॉल्व नसतो. एखादा बाधित व्यक्ती ट्रिपल लेअर मास्क वापरत असेल तर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या एरोसॉलला 95 टक्के रोखण्यात यामुळे यश येतं. यामुळे त्याच्यासोबत असलेल्याला कोरोनाचा धोका कमी होतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com