दात घासले नाही तर होऊ शकतात अनेक समस्या; जाणून घ्या रोगांविषयी

Nagpur news Many problems can occur if the teeth are not brushed
Nagpur news Many problems can occur if the teeth are not brushed

नागपूर : आजकालच्या काळात पालक आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जागरूक असतात. या जागरूकतेमध्ये दखल घेण्याजोगा महत्त्वाचा घटक म्हणजे दात. कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात.

या चारही घटकांपैकी केस, डोळे, नाक हे तिन्ही घटक सुंदर असले आणि दात मात्र वेडेवाकडे किंवा फारच पुढे असले तर मात्र बाकी सर्व घटक हजर असूनही वेड्यावाकड्या दातांमुळे चेहऱ्याला कुरूपता येते आणि चर्वण क्षमता कमी होते.

माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमित दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने दात स्वच्छ करणे या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. 

दात किडणे

दातांची कीड हा एक तोंडामधल्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. तोंडात असलेले जिवाणू दातावर साठून राहिलेल्या अन्नकणांमधल्या साखरेवर प्रक्रिया करून ॲसिड तयार करतात आणि या ॲसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे आवरण विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते. या आवरणाला पडलेल्या छिद्रामध्ये अजून अन्नकण अडकतात, अधिकाधिक जिवाणू ॲसिड हल्ला सुरू ठेवतात. दात स्वच्छ न केल्याने किडे होतात. जिवाणू दातांच्या शेवटी पोहोचतात तेव्हा ते आपल्या हिरड्यांवर आक्रमण करण्यास सुरुवात करते. ठरावीक कालावधीनंतर दात कमकुवत आणि क्षीण होतात. त्यानंतर पोकळी आणि दात खराब होते.

दातांना डाग

जेव्हा आपण कॉफी, चहा, बीट्स आणि वाईनं सारखे पिग्मेंटेड अन्न खातो किंवा पिता तेव्हा आपले दात पिवळसर होऊ शकतात. न्याहारीपूर्वी दात घासले नाही तर दातांना डाग पडतात आणि ते कुरूप दिसतात.

हिरड्यांचा आजार

फारच कमी लोकांना माहिती आहे की ब्रश न केल्याने दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक रोगांचा धोका कमी होतो. आपण रात्री ब्रश केला नाही तर टार्टर दातांवर जमा होतो आणि हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याची समस्या उद्भवते.

श्वासाची दुर्गंधी

श्वासाची दुर्गंधी हे मुख्यतः: तोंडाच्या खराब आरोग्यामुळे येते. लहान अन्न कण जास्त काळ दातात फसून राहिल्यास दुर्गंधी येऊ लागते. चांगल्या प्रकारे दात घासले नाही तरी वास येते. यामुळे तोंडात अधिक बॅक्टेरिया तयार होतात. जीभ साफ करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com