esakal | shardiya Navratri 2021: नवरात्रीत उपवासा दरम्यान फॉलो करा 'हा' हेल्दी डाइट प्लान
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रीत उपवासा दरम्यान फॉलो करा 'हा' हेल्दी डाइट प्लान

जर तुम्ही नवरात्रीला उपवास ठेवला असेल तर यासोबत हेल्दी राहणे तितकेच महत्वाचे आहे

नवरात्रीत उपवासा दरम्यान फॉलो करा 'हा' हेल्दी डाइट प्लान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सात ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभर नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. याच नऊ दिवसीतील म्हणजेच नवरात्रीतील आजचा सहावा दिवस आहे. या दिवसात देवीच्या वेगवेगळ्या स्वरुपातील पूजा बांधल्या जातात. या दिवसांत अनेकजण उपवास करतात. हा उपवास नऊ दिवसांचा असतो. यादरम्यान काही फळे आणि ज्युस पिणे उत्तम असते. ज्यामुळे शरीरात पाणी पातळी उत्तम राहण्यास मदत होते. उपवासादरम्यान शरीर थंड ठेवणे गरजेचे असते. जर तु्म्ही नवरात्रीला उपवास ठेवला असेल तर यासोबत हेल्दी राहणे तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही या पद्धतीत उपवासाचा आहार घेऊ शकता..

ब्रेकफास्ट -

उपवासावेळी तुम्ही शाबूदाणा खिचडी खाऊ शकता. बटाट्याचे वडे आणि लस्सीही पिऊ शकता. सकाळच्या नाश्तासाठी तुम्ही राजगीऱ्याचा लाडू आणि मखाने पुडिंगही खाऊ शकता. याशिवाय बदाम आणि किशमिश दह्याचा वापरही करु शकता.

हेही वाचा: घरगुती उपाय करून मिळवा डँड्रफपासून मुक्ती

दुपारी काय खावे ?

दुपारच्या दरम्यान तुम्ही भाजी आणि शाबूदाण्याची खिचडी आणि दही खाऊ शकता. दही आणि बटाट, डाळिंब आणि पुदीण्याची चटणी खाऊ शकता. याशिवाय दुधीची भाजी, राजीगराची भाकरी, शिजवलेला शाबूदाना, बटाटा पराठा, असे पदार्थही खाऊ शकता.

सायंकाळी काय खावे ?

सायंकाळच्या नाश्तासाठी रोस्टेड पनीर, पेरू, सफरचंद, ताक, तळलेले बटाटे वेफर्स असे पदार्थ खाऊ शकता.

हेही वाचा: नवरात्री उपवासावेळी फराळाच्या ताटात दह्याची वाटी ठरेल फायद्याची

रात्री काय खावे ?

अशा वेळी रात्रीचा हलका आहार घेणे गरजेचे असते. यामुळे रात्रीसाठी तुम्ही शाबूदाना कटलेट आणि दुधीची खीर खाऊ शकता. याशिवाय पनीरची खीर, बदाम दुध, फ्रुट क्रीम, केसर दूध, शाबूदाना खीर खाऊ शकता.

loading image
go to top