कोरोना रोखण्यात ज्येष्ठमध गुणकारी; संशोधकांनी केला दावा

Jyeshthmadh_Licorice
Jyeshthmadh_Licorice

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण असताना दिलासा देणारे संशोधन समोर आले आहे. गुरूग्राम येथील नॅशनल ब्रेन रिसर्च केंद्राने (एनबीआरसी) ज्येष्ठमध हे कोरोना रोखण्यावर गुणकारी असल्याचा दावा केला आहे. आयुष मंत्रालयाकडूनही यासंबंधी चाचण्या सुरू झाल्या आहेत. विषाणूंचा संसर्ग झाला, तर पेशींमधून अनेक प्रकारची रसायने उत्पन्न होतात. त्याला शास्रीय भाषेत प्रो-इंफ्लेमेटरी सायटोकाइन म्हणतात. ते शरीरात विषाणूंचे संक्रमण होण्यापासून बचाव करतात. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर सायटोकाइनची अनियंत्रित वाढ होऊ लागते. यामुळे फुप्फुसाच्या पेशींना हानी पोचू लागते.

कोरोनाचा हा संसर्ग खूप धोकादायक ठरू शकतो. जीवघेण्या ठरू शकतील, अशा या सायटोकाइनची वाढ रोखण्याचे काम ग्लायसिरायझिन हा घटक करतो. ज्येष्ठमधातील ग्लायसिरायझिनमुळे शरीरात उत्पन्न झालेला सायटोकाइन निर्मितीचा झंझावत हा कमी होतो. तसेच शरीरातील विषाणूंची वाढणारी संख्या देखील रोखली जाऊ शकते. त्यातून संभाव्य जीवघेणा धोका टळला जाऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

‘एनबीआरसी'तील शास्रज्ञ डॉ. एलोरा सेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. डॉ. सेन यांच्यासह पृथ्वी गौडा, श्रुती पॅट्रिक, शंकर दत्त जोशी, राजेश कुमार कुमावत यांनी केलेले संशोधन एका विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्धही झाले आहे. डॉ. सेन ‘सकाळ’शी बोलताना म्हणाल्या, ‘प्रयोग करताना कोरोनाबाधित फुप्फुसांच्या पेशींमध्ये आम्ही ग्लायसिरायझिनची मात्रा सोडली. त्यावेळी विषाणूंची वाढ रोखली गेल्याचे दिसून आले. ज्येष्ठमधातील मूळ घटक (अँक्टिव्ह कंपाऊंड) ग्लायसिरायझिन आहे. त्याचा नियंत्रित वापर कोरोनावर गुणकारी ठरू शकतो. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.’

आम्ही ज्येष्ठमधाचा प्रत्यक्ष वापर करून प्रयोगशाळेत चाचण्या केल्या नाहीत. मात्र ग्लायसिरायझिन कंपाऊंड वापरून प्रयोग केला आहे. त्यात विषाणूंची वाढ रोखली गेल्याचे आढळून आले आहे. यावर अधिक चाचण्या होण्याची गरज आहे.
- डॉ. एलोरा सेन (शास्रज्ञ, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर)

जभरातील विविध संशोधनात ज्येष्ठमधातील औषधी गुणधर्म सिद्ध झाले आहेत. ज्येष्ठमध कोरोना रोखण्यासाठी कितपत‌ गुणकारी आहे, यावर आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमार्फत (सीएसआयआर) संयुक्त संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष महिनाभरात समोर येतील.
- डॉ. भूषण पटवर्धन (नॅशनल रिसर्च प्रोफेसर, आयुष मंत्रालय)

- हेल्थ-फिटनेसशी संबंधीत बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com