आरोग्य सेतू ॲपचे ‘हे’ व्हर्जन येणार पुढील दोन आठवड्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

जगभर करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतात करोना व्हायरसवर आळा घालण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू ॲप खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. त्यामुळे ३ एप्रिलला भारत सरकारने आरोग्य सेतू अॅप लॉन्च केलं आहे. मात्र, या आरोग्य सेतू ॲप वापरणाऱ्या युजर्सने सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केला होता.

जगभर करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतात करोना व्हायरसवर आळा घालण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू ॲप खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. त्यामुळे ३ एप्रिलला भारत सरकारने आरोग्य सेतू अॅप लॉन्च केलं आहे. मात्र, या आरोग्य सेतू ॲप वापरणाऱ्या युजर्सने सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केला होता. कारण या ॲपवर रजिस्टर करण्यासाठी युजरला त्याचे नाव, लिंग, ट्रॅव्हल हिस्ट्री, मोबाईल नंबर आणि लोकेशन ही माहिती द्यावी लागत होती. कारण सरकारने ॲप लॉन्च केले होते. मात्र त्याचा सोर्स जाहीर केला नव्हता. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे राष्ट्रीय माहिती केंद्राने (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) सांगितलं आहे. सरकारच्या माहितीनुसार, भारतामध्ये ११ कोटींपेक्षा जास्त नागरिक या आरोग्य सेतू ॲपचा वापर करत आहेत.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत देशात अनेक लोकांना करोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला. या करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप लॉन्च केले आहे. हे अॅप सरकारी आणि खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू ॲप सुरू ठेवणे, केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. राष्ट्रीय माहिती केंद्राने हे अॅप तयार केले आहे. गेल्या आठवड्यात या ॲपमधील सर्विस आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आरोग्य सेतू ॲपमध्ये आयओएस व्हर्जन पुढील दोन आठवड्यात लॉन्च होणार आहे. याबाबत एका इंग्रजी दैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आता कोणालाही घाबरण्याचे कारण नाही आणि अॅपमधील डाटा चोरीला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.याबाबत एका इंग्रजी दैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
देशातील सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करण्याचे आवाहनही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. परंतु आरोग्य सेतू अॅपमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते की, याचा योग्य वापर केला जाऊ शकतो का? या ॲपमधील आपला डेटा सुरक्षित आहे का? याचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? या ॲपबद्दल प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न युजर्सना भेडसावत होते. पण आता घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
करोनाव्हायरसची जोखीम कितपत आहे, याबाबत आकलन करणारे हे ॲप राष्ट्रीय माहिती केंद्राने लॉन्च केले आहे. जोपर्यंत करोनावर लस निर्माण होत नाही. तोपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, हात धूत राहणे या गोष्टी सतत कराव्या लागतील. पण यालाच जोड देत केंद्र सरकारने करोनाची माहिती देण्यासाठी तसेच आपण कोणत्या व्यक्तिस भेटतो, कुठे जातो, तिथे करोनाचे कोणते रुग्ण आहेत का? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच करोनाव्हायरसबाबत अलर्ट राहण्यासाठी सरकारकडून आरोग्य सेतू ॲप तयार केले आहे. 
आरोग्य सेतू ॲपने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य सेतू ॲप वापरकर्ता ॲपमध्ये नोंदणी करताना संपर्काबाबतची माहिती जमा करतो. वापरकर्त्याच्या भागात करोना रुग्ण आढळल्यास त्याच्या स्थानाबाबत माहिती मिळते आणि ही माहिती सुरक्षित सर्व्हरमध्ये सेव्ह केली जाते. करोनाव्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेले आरोग्य सेतू ॲप सर्व खासगी आणि सरकारी कर्मचारी तसेच कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The next version of the app will come from Health Set in two weeks