अशी असते होमिओपॅथी ही उपचार पद्धती...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे ऍलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी असे विविध वैद्यकीय उपचार घेतले जातात.

सध्याच्या काळात होमिओपॅथी खूप लोकप्रिय व सशक्त उपचार पद्धती म्हणून प्रसिद्ध होत आहे. शरीर व मनाची एक उत्साही व कार्यक्षम अवस्था किंवा इंद्रीय, मन, आत्मा यांची प्रसन्नावस्था म्हणजे आरोग्य होय.

आरोग्याची विभागणी शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य व अध्यात्मिक आरोग्य अशी तीन विभागात केली गेली आहे.

शरीर व मन यांना आपण एकमेकांपासून विभक्त करू शकत नाही. रोगलक्षणे फक्त शारीरिक असली तरी त्यांचा परिणाम मनावर होत असतो. त्याचप्रमाणे काही मानसिक व्याधींमध्ये मान, लक्षणे वा रोगाचा परिणाम शरीरावर होतच असतो. काही रोगांमध्ये शारीरिक व मानसिक दोन्हीही लक्षणे असतात. ऍलोपॅथीमध्ये रुग्णाची लक्षणे पाहून त्याचया व्याधीनुसार उपचार केले जातात.

आयुर्वेदामध्ये रुग्णाच्या लक्षणाबरोबर नाडी परीक्षण, उदर परीक्षण, सप्तधातू इत्यादींची विचार करून चिकित्सा केली जाते. होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची Constitutional (सार्वदेहीक) मेडिसीन निश्‍चित केले जाते. ज्यामुळे रुग्णाचे शारीरिक व मानसिक संतुलन साधले जाते.

काही वेळा Acute अवस्थेमध्ये त्या त्या लक्षणामुसार तत्कालीक औषधे दिली जातात. तर व्याधीचा पुनरुद्‌भव टाळण्यासाठी Intercuvrent medicines दिली जातात.

  •  मानसिक लक्षणांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास फक्त होमिओपॅथिमध्येच केला जातो.
  •  होमिओपॅथी ही एक नासर्गिक चिकित्सा पद्धती आहे.
  •  औषधे चवीला गोड, घेण्यास सुलभ आहेत. त्यामुळे जन्मलेल्या बाळापासून वृद्धांपर्यंत सर्व आनंदाने घेतात.
  •  रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  •  रोगाचा समूळ नाश होतो.
  •  औषधाची मात्रा अतिशय कमी असल्याने साईड इफेक्‍ट नाहीत.
  •  तत्काळ व्याधींमध्ये काही सेकंदातच चांगला फायदा मिळतो. ताप-सर्दी-खोकला, अतिसार, उलटी, आम्लपित्त यासारख्या आजारांवर लवकरच उपशय मिळतो.

संधीवात, मूळव्याध, मूतखडा, सोरायसिस, दमा, ऍलर्जी, कॅन्सर, यकृत विकार, किडणी फेल्युअर इत्यादी जुनाट व गंभीर आजारांवर होमिओपॅथिक उपचाराने नियंत्रण मिळविता येते.लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व व डिप्रेशन, रिक्‍जोफ्रेनिया इत्यादी मानसिक विकारात विशेष उपयुक्त.

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nowadays homeopathy is becoming very popular and powerful treatment method kolhapur