
डॉ. ऋतुपर्ण शिंदे
आपण फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल तेव्हाच विचार करतो, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो. मात्र, फुफ्फुसांवर दडपण निर्माण करणारा एक मोठा आणि सतत वाढणारा घटक म्हणजे स्थूलता. लठ्ठपणामुळे छाती व पोटाभोवती साचणारी चरबी फुफ्फुसांच्या हालचालींवर मर्यादा आणते. परिणामी, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि वेळेनुसार अनेक श्वसनसंबंधी विकार निर्माण होतात.