मद्यपान सोडायचे आहे? या टिप्स फॉलो करा

अमेरिकन मॉडेल बेला हदीदने नुकतेच मद्यपान सोडले आहे
no Alcoholic
no Alcoholic esakal

अमेरिकन मॉडेल बेला हदीदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मद्यपानाचा अनुभव सांगत आपला दारू सोडण्याचा निर्णय जाहीर केला. एका आंतरराष्ट्रीय मीडिया पोर्टलला तिने याबाबात माहिती दिली. बेलाच्या मद्यपान करण्याची सवय इतकी जास्त होती की तिला स्वत:वर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र तिने ठरवून मद्यपान सोडण्याचा निर्णय घेतला. मद्यपानामुळे एखाद्या व्यक्तीला खूप घातक परिणाम सहन करावे लागतात. त्यामुळे मद्यपान सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला जर मद्यपान सोडायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.

no Alcoholic
कोरोनाला रोखण्यासाठी रेड वाईन करतेय मदत? संशोधनात दावा

मद्यपानाचे व्यसन म्हणजे काय? (What is alcohol addiction?)

डब्ल्यूएचओ अल्कोहोलला सायकोएक्टिव्ह पदार्थ म्हणून परिभाषित केले आहे. अल्कोहोल जास्त प्यायल्याने समाजात मोठ्या प्रमाणात रोग, सामाजिक आणि आर्थिक भार पडतो, असे त्यात म्हटले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण हे दरवर्षी 6.2 लीटर शुद्ध अल्कोहोल आहे, जे दररोज 13.5 ग्रॅम शुद्ध अल्कोहोलच्या बरोबरीचे आहे. अहवालानुसार, अल्कोहोलच्या सेवनामुळे दरवर्षी सुमारे 3.3 दशलक्ष मृत्यू होतात. हे आकडे चिंता वाढविणारे आहेत.

no Alcoholic
मद्यालाही असते Expiry Date! बाटली ओपन केल्यानंतर किती काळ टिकते जाणून घ्या
alcohol addiction?
alcohol addiction?esakal

व्यसन कशामुळे लागते? (What causes alcohol addiction?)

2020 च्या अभ्यासानुसार, अल्कोहोलचे सेवन व्यक्तीच्या डोपामाइन आणि सेरोटोनिनच्या स्तरांवर परिणाम करते. यामुळे व्यक्तीला मद्यपान सतत करण्याची भावना निर्माण होते. जसजसे दारूचे सेवन वाढते तसतसे व्यसनाची पातळी वाढते. मद्यपान दिनक्रम झाल्यावर भूक, झोप आणि मूड यावर परिणाम होऊ लागतो. तेव्हाच मद्यपान हे व्यसन बनले आहे हे कळायला हवे. ते कळल्यावर मद्यपान कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

no Alcoholic
Red Wine रोज प्यायल्याने शरीरावर होतात पाच परिणाम

व्यसनावर मात करण्यासाठी उपाय (Overcoming alcohol addiction )

या व्यसनावर मात करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी वर्तणूक थेरपी (Behavioral therapy ) हा प्रभावी उपचार समजली जाते. . एखाद्याने मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन मदत घेणेही योग्य ठरू शकते. दारू पिण्याची गरज किंवा लालसा कमी करण्यासाठी औषधांची शिफारस केली जाते. अचानक मद्यपान सोडल्याने शरीरात मोठे चढउतार होतात. त्यावर योग्य उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

no Alcoholic
नियमित बिअर प्यायल्याने शरीरावर होतात चार परिणाम, जाणून घ्या
qutting alcohol
qutting alcohol

मद्यपान ही समस्या कधी बनते?

मद्यपान जास्त झाल्यावर तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो. तुमचे दैनंदिन चक्र बिघडते. कौटुंबिक, व्यावसायिक आयुष्यात समस्या यायला सुरूवात होते. तुम्ही दुसऱ्यांशी नीट संवाद साधू शकत नाही. मद्यपानाचे व्यसन केवळ व्यक्तीलाच नाही तर जवळच्या लोकांनाही त्रासदायक ठरते. मद्यपान केल्यानंतर गाडी चालवल्याने अनेक अपघातही घडले आहेत.

no Alcoholic
स्त्रियांचे मद्यपान करण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा अधिक, अभ्यासात स्पष्ट
Alcohol
AlcoholEsakal

अल्कोहोल शारीरिक मानसिक परिणाम कसा करते? (How does alcoholism affect your mental and physical health?)

संशोधकांनी मद्यपानाचा संबंध मेंदूच्या कार्यातील बदल आणि मेंदूच्या विविध रासायनिक आणि हार्मोनल प्रणालींमधील बदलांशी जोडला आहे. याशिवाय दारूच्या व्यसनाशी निगडीत सामाजिक समस्या या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. मोठ्या प्रमाणात मद्यसेवनामुळे कायदेशीर, आर्थिक आणि नातेसंबंधांशी संबंधित सामाजिक समस्या देखील उद्भवतात ज्यामुळे व्यक्तीमध्ये दुःख आणि चिंता निर्माण होते.2017 च्या WHO च्या अहवालानुसार, भारतातील यकृताच्या आजाराने होणारे मृत्यू 259,749 किंवा एकूण मृत्यूंपैकी 2.95% होते. भारतात दरवर्षी यकृत सिरोसिसचे सुमारे 10 लाख रुग्णांचे नव्याने निदान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com