सावधान! तुम्हालाही मौखिक आरोग्याच्या समस्या जाणवतात का? असू शकतो 'हा' गंभीर आजार

 oral health day first symptom of gastrointestinal disease is oral health
oral health day first symptom of gastrointestinal disease is oral health
Updated on

नागपूर : शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु, मौखिक तसेच दातांच्या आरोग्याकडे तितक्‍याशा गांभीर्याने पाहिले जात नाही. लोक आपल्या मौखिक आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास याचा परिणाम म्हातारपणी भोगावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी जीरोडॉन्टालॉजी ही दंतवैद्यकशास्त्राची शाखा निर्माण झाली आहे, अशी माहिती डॉ. तुषार दाभाडे यांनी दिली. 

दरवर्षी ५ फेब्रुवारी हा दिवस डॉ. जी. बी. शंख्वाळकर यांचा जन्मदिन 'मौखिक आरोग्य दिन' म्हणून ओळखला जातो. दातांची कीड, हिरड्याचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखूमुळे होणारे मुखाचे आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात समावेश होतो. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. तरीदेखील मौखिक आरोग्याकडे गंभीरतेने बघितले जात नाही. मौखिक शुद्धता आणि दंत आरोग्य याकडे नागरिकांचे लक्ष नाही. वृद्धावस्थेत मौखिक पेशींवर परिणाम होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. मौखिक आरोग्य म्हणजे केवळ दातांच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नाही तर एकूणच मुखाची निगा राखण्याकडे लक्ष द्यावे. जेवताना रात्री दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी विशेष 'ब्रश' आहेत. ब्रशने शास्त्रशुद्ध वापरातून दात स्वच्छ करावे. मधुमेहासह पचनसंस्थेतील दोष यांसारख्या रोगांची पहिली लक्षणे मुखामध्येच आढळतात, असे डॉ. दाभाडे म्हणाले. 

हे करा -

  • सकाळी आणि रात्री तीन मिनिटे दात स्वच्छ घासले पाहिजेत. 
  • टंग क्‍लीनर किंवा हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. 
  • दातांच्या फटीतील कण काढण्यासाठी 'डेंटल फ्लास' या दोऱ्यानेच काढावेत 
  • तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. 

दंत आरोग्याकडे सारेच दुर्लक्ष करतात. वृद्धावस्थेत दातांची झीज झाल्यानंतर मौखिक आरोग्य सांभाळणे कठीण असते. तसेच लहानपणी दुधाचे दात किडले तरी ते दात पडणारच आहेत, ही भावना पालकांच्या मनात असते. मात्र, दुधाचे दात किडून पडले तर येणाऱ्या नवीन दातांना धोका असतो. 
-डॉ. तुषार दाभाडे, दंत चिकित्सक, नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com