पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे; विविध आजारांवर पपईच्या पानांचाही प्रभाव!

बाळकृष्ण मधाळे
Wednesday, 23 September 2020

पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचेही खूप फायदे आहेत. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे.

सातारा : पपई ही वनस्पती कॅरिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे. ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून मेक्सिकोत प्रथम तिची लागवड करण्यात आली. हल्ली या औषधीय वृक्षाचा प्रसार जगातील सर्व उष्ण प्रदेशांत झालेला दिसून येतो. ब्राझील, मेक्सिको, नायजेरिया, इंडोनेशिया, चीन व पेरू या देशांत पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प. बंगाल, आसाम, केरळ, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत पपईची लागवड केली जात असून देशात पपईचे एकूण उत्पादन सुमारे २६ लाख टन प्रतिवर्षी होते.

पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. पपई हे फळ सगळीकडे उपलब्ध आहे. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाण्याचे फायदे देखील आहेत..

शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते : पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.

वजन घटवण्यास मदत होते : एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते : आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

मधुमेहींसाठी गुणकारी : पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते : पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

सांधेदुखीपासून आराम मिळतो : पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.

पचन सुधारते : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.

मासिक पाळीचा त्रास कमी होतो : अनियमित मासिक पाळी, तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

कर्करोगापासून बचाव होतो :  पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.

प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? आहारात करा या पालेभाज्या आणि फळांचा सामावेश

पपईच्या पानांमध्ये डेग्यूंचा प्रभाव कमी करण्याची क्षमता 

सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधांसोबतच काही घरगुती उपाय करणं देखील फायदेशीर ठरतं. फळं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे आपण सारेच जाणतो. पण, त्यातल्या त्यात पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच पपईची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अनेक आजरांवर पपईच्या पानांचा रस फायदेशीर असतो. डेंग्यू, मलेरिया याशिवाय पपईच्या पानांचा रस हार्ट अटॅक, डायबेटीज, डेंग्यू आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून शरीराचं रक्षण करतो. संशोधनानुसार, पपईच्या पानांमध्ये डेग्यूंचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करून शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव करण्यासह मदत होते. जाणून घेऊयात पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे..

प्लेटलेट काउंट वाढविण्यासाठी अनेक संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, पपईच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील प्लेटलेट्स आणि आरबीसी काउंट वाढतो. त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेशनही वाढतं. यामुळे डेंग्यू झालेल्या रूग्णांना पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. 

कॅन्सरपासून बचाव पपईच्या पानांच्या रसामध्ये अॅन्टी-ट्यूमर गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. जे कॅन्सरचे काही प्रकार, विविध प्रकारच्या अॅलर्जी यांसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संशोधनानुसार, पपईच्या पानांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. याचा ज्यूस प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि किडनी, लिव्हर आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

बद्धकोष्ठता आणि मूळव्याधावर परिणामकारक पपईला लॅक्सेटिव्ह म्हणून ओळखले जाते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.

एकंदरीत, आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Papaya Fruit Is Beneficial For Health Satara News