कोरोनामुक्त झाल्यानंतर केस झडण्याचं टेन्शन, 8 घरगुती उपाय

कोरोनामुक्त झाल्यानंतर केस झडण्याचं टेन्शन, 8 घरगुती उपाय

post covid 19 symptoms hair fall : दीड वर्षांपासून जगावर कोरोनाचं संकट आहे. लाखोंनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे. यामधीलच एक समस्या म्हणजे, कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना गेस गळतीचा त्रास सहन करावा लागत आहे. याची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. तज्ज्ञांच्या मते कोरोनामुक्त झाल्यानंतर एक ते दोन महिन्यानंतर केस झडण्याच्या समस्या सुरु होऊ शकतात.

का झडतात केसं?

तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूचा प्रभाव जास्त कालावधीपर्यंत राहू शकतो. यामध्ये केस झडण्याची समस्या हेही एक लक्षण आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, मानसिक तनाव होय. कोरोना रुग्णांमध्ये दीर्घ कालावधीपर्यंत तणावाची स्थिती राहते. त्यामुळेच कोरोनामुक्त झाल्यानंतर काही जणांना केस झडण्याच्या समस्येला सामोरं जावं लागते. याशिवाय ट्रॉमा आणि शॉकही कारण असू शकते.

कोरोनामुक्त झाल्यानंतर केस झडण्याचं टेन्शन, 8 घरगुती उपाय
सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

केस गळीच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय आहेत. जाणून घेऊयात या घरगुती उपायाबद्दल...

खोबरेल तेल -

खोबरेल तेलांमद्ये पॉटेशियम आणि आयरन असते. याच्या वापरामुळे केस झडण्याची समस्या कमी होऊ शकते, त्याशिवाय केसही वाढतील. आठवड्यातून दोन वेळा कोमट तेल केसांना लावल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

प्रोटीन आणि व्हिटॅमिन -

दररोजच्या जेवणात प्रोटीन आणि व्हिटॅमन मिळेल अशा पदार्थांचा समावेश करा. शरिरात प्रोटीन आणि व्हिटॅमिनची कमी झाल्यानंतरही केस झडण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे प्रोटिन आणि व्हिटॅमिन वाढवण्यावर भर द्या.

ग्रीन टी -

ग्रीन टी मुळे शरिरातील फक्त मेटाबॉलिज्म वाढत नाही तर शरिरातीत अनावश्यक चरबीही कमी होते. तसेच ग्रीन टी पिल्यामुळे केस झडण्याची समस्याही कमी होईल. ग्रीन टी बॅग्सला हेअर मास्कच्या स्वरुपात आपण वापरु शकतो. ग्रीन टी केसाला लावल्यामुळे केस वाढण्यास मदत होईल. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सीडेंटचं प्रमाण जास्त असल्यामुळे केस झडण्याची समस्या दूर होईल.

कांदा -

कांद्यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी इंप्लेमेट्री गुण आहेत. या गुणांमुळे केस मजबूत होण्यास मदत आहेत. त्याशिवाय केस झडण्याची समस्याही कमी होते. कांद्यामध्ये सल्फरचे प्रणाही जास्त आहे. सल्फरमुळे केसांना प्रोटीन केराटिन मिळते. कांद्याचा रस नियमित लावल्यानंतर केस मजबूत होतात अन् वाढतात.

कोरोनामुक्त झाल्यानंतर केस झडण्याचं टेन्शन, 8 घरगुती उपाय
२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम

मेथीच्या बिया

केसांची गळती रोखण्यासाठी मेथीच्या बिया परिणामकारक ठरतात. प्रोटीन, आयरन आणि निकोटिनिक अॅसिडमुळे केस झडण्याची समस्या दूर होईल.

ओमेगा 3 फॅटी अॅसिड

निरोगी केसांसाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड महत्वाची भूमिका पार पाडते. बादाम, आवेकेडो आणि ऑलिव्ह यांचं मिश्रण करुन तेल तयार करा. यामुळे केस मजबूत होण्याबरोबर झडण्याची समस्याही दूर होईल.

कोरफड -

केस गळती रोखण्यासाठी कोरफडला ओळखलं जातेय. एरंडीच्या तेलात कोरफड मिसळून वापरल्यास केसांती मूळे बळकट होण्यास मदत होईल.

तेलाने मालिश करणे -

नियित तेल लावून मालिश केल्यानतर फक्त तणावच कमी होत नाही, तर केस झडण्याची समस्याही कमी होईल. तसेच रक्ताभिसरणही व्यवस्थित होईल. नियमित तेलाने मालिश केल्यानंतर केस चमकदार आणि स्वास्थ होतील.

कोरोनामुक्त झाल्यानंतर केस झडण्याचं टेन्शन, 8 घरगुती उपाय
Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com