esakal | हाताला रबर बँड बांधताय? उद्भवतील 'या' गंभीर समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

rubber band

हाताला रबर बँड बांधताय? उद्भवतील 'या' गंभीर समस्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि दुहेरी जबाबदारी यामुळे महिलांना अनेकदा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. नेहमी त्या इतरांची काळजी घेण्यात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वतःसोबत नेहमी तडजोड करतात. कमी वेळात जास्त काम करण्याची घाई अनेकदा त्यांना आरोग्याच्या गंभीर (health issue) समस्या उद्भवू शकतात. कधीकधी घाईघाईत हातात रबर बँड (rubber band) बांधण्याच्या चुका देखील महिला करतात. मात्र, हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. (problems create due to rubber band on wrist)

हेही वाचा: पोस्ट कोविड लक्षणे असल्यास बाळाला स्तनपान करावे का?

रक्त प्रवाहामध्ये अडथळा -

आपण आपल्या हाताच्या मनगटावर घट्ट रबर बँड बांधला असेल तर रक्ताचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे तुमचे हृदय आणि मेंदू दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. रक्त प्रवाह नीट झाला नाहीतर आपल्या हाताचे स्नायू कमकुवत होतात. कधीकधी हातांना त्यांचे कार्य करण्यास अडचण येते. आपण आपल्या मनगटावर बर्‍याच वेळा रबर बँड बांधला असेल आणि आजवर आपल्याला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या आली नसेल तरीही सतर्क राहणे गरजेचे आहे. मनगटावर रबर बँड बांधून, रक्तपुरवठा करणार्‍या नसा दाबू लागतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूचा झटका येण्याची शक्यताही वाढते

त्वचा संक्रमण -

जेव्हा आपण मनगटावर वापरलेला रबर बँड वापरतो तेव्हा तो त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेला देखील संसर्ग होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला त्वचेवर सूज देखील येऊ शकते. जर मनगटावर रबर बँड बांधून ठेवला असेल तर त्वचेवर खाज सुटणे ( या टिप्सपासून मुक्तता ) किंवा त्वचेवर जळजळ होणे हे संक्रमणाचे लक्षण आहे. वास्तविक, केसांना नेहमीच प्रदूषणाचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत केसांना जोडलेला रबर बँडसुद्धा प्रदूषित होतो. जेव्हा रबर बँडचा त्वचेशी संबंध येतो तेव्हा त्वचा देखील संक्रमित होते.

त्वचेवर डाग -

आपल्या हातावर कशाचेही डाग पाहणे आपल्याला अजिबात आवडणार नाही. मात्र, रबर बँड बांधल्यामुळे मनगटावर कुरूप डाग पडू शकतात. तुम्हाला रबर बँड बांधण्याची सवय असेल तर मग हे कुरूप डाग पाहण्याची सवय देखील लावावी लागेल. इतकेच नव्हते हे डाग काळे पडतात आणि कायमचे हातावर राहतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image