दात घासताना 'या' चुका करताय? जाणून घ्या योग्य पद्धत

teeth
teethe sakal

सकाळी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करणे ही प्रत्येकाची सवय आहे. मुखस्वच्छतेमध्ये (oral hygiene) हे सर्वात महत्वाचं कारण आहे. दात नीट स्वच्छ करता काय आणि दिवसातून कमीतकमी कितीवेळा घासता? यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. मात्र, मौखिक आरोग्य राखण्यासाठी आणखी एक कारण आहे. तुम्ही दात घासताना चुकीच्या पद्धतीने तर करत नाहीत ना? आज दात घासण्याच्या योग्य पद्धती कोणत्या? याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (proper way of tooth brushing)

teeth
डोसचा अवधी चुकलेल्या बालकांना न्यूमोकोकल लस देणार कशी?

दात घासण्याचे योग्य पद्धत कोणती? -

  • दातांच्या आतील भागात उभ्या पद्धतीने ब्रश करणे गरजेचे आहे.

  • दाताच्या बाहेरील भागात गोलाकार स्थितीत ब्रश करावा.

  • या दोन्ही स्थितीत जवळपास ९० टक्के ब्रशिंग केले पाहिजे. त्यामुळे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने दात स्वच्छ होतात.

  • ब्रश आडवा पकडून दात घासल्यास कॅविटी दूर होत नाही.

ब्रश करताना ही चूक करू नका -

अनेकजण दात घासताना फार वेगाने घासत असतात. यावेळी आपल्या दात आणि हिरड्यांना इजा होते. त्यामुळेच काही काळानंतर कॅविटी तयार होतात. तसेच दातं आणि हिरड्यांमध्ये वेदना सुरू होते. त्यामुळे दात घासताना घाई करू नका.

दात घासताना 'या' चुका टाळा -

  • दर 3 महिन्यांनी ब्रश न बदलणे ही मोठी चूक असू शकते. आपल्या टूथ ब्रशमध्ये काही एन्झाईम असतात जे कालांतराने तोंडात येऊ लागतात.

  • खूप मऊ किंवा खूप कठोर असलेला टूथब्रश वापरू नका.

  • २ मिनिटांपेक्षा कमी वेळ दात घासणे धोकादायक ठरू शकते.

  • ब्रश करताना जीभेची देखील स्वच्छ करा. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येणार नाही.

  • आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ तोंडात ब्रश ठेवणे. ब्रश करताना पेपर वाचणे, बोलणे, बराच वेळ ब्रश तोंडात ठेवणे, या सर्व गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com