esakal | चुकीच्या पद्धतीने पाणी पिताय? उद्भवू शकतात 'हे' आजार
sakal

बोलून बातमी शोधा

file image

चुकीच्या पद्धतीने पाणी पिताय? उद्भवू शकतात 'हे' आजार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नागपूर : पाणी पिण्याची चांगल्या पद्धती तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हीही पाणी पिताना चुका करत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. प्रत्येक जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र कोणीही तुम्हाला पाणी पिण्याची पद्धती सांगत नाही. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. मात्र, पाणी चुकीच्या पद्धतीने पीत असाल तर तितकेच नुकसान देखील होते. दिवसाला ३ ते ५ लीटर पाणी प्यावे असे सांगितले जाते. मात्र, पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे? याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सकाळी उपाशीपोटी पाणी प्या -

आरोग्यतज्ज्ञ सांगतात, की सकाळी उपाशी पोटी पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट देखील राहते. तसेच शरीर डिटॉक्स देखील होते. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघून अनेक आजारांपासून सुटका मिळते.

उभे राहून पाणी पिऊन नका -

वर्क आऊट केल्यानंतर उभे राहून पाणी पिऊ नका. यामागे काय लॉजिक असेल याचा कधी विचार केला का? कारण पाणी प्यायल्यानंतर पोटाच्या खालच्या भागात जाते आणि शरीराला पोषक तत्व मिळत नाही.

हेही वाचा - मैत्रिणीला फिरायला घेऊन जाणं पडलं महाग, तब्बल ६ लाखांचा गंडा

वर्कआऊटनंतर पाणी प्यायला विसरू नका -

एक्सरसाईज केल्यानंतर पाणी प्यायला विसरू नका. यामुळे तुमच्या शरीरातील पाणी कमी होत नाही. तसेच शरीर नेहमी हायड्रेट राहील.

पाणी पिताना थोडे-थोड प्या -

अनेकवेळा पाणी पिताना आपण एकाचवेळी पितो. मात्र, यामुळे शरीराला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे पाणी हळूहळू प्या. तसेच मेटाबलिज्म चांगले राहते.

खाण्यापूर्वी अर्धा तास पाणी प्या -

तुम्ही जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायले तर जेवण होत नाही. त्यामुळे अर्धा तासपूर्वी पाणी प्या. जेवणानंतर लगेच पाणी प्याल्यास अॅसिडिटी होण्याचा शक्यता आहे.

हेही वाचा - हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास हे आहेत नुकसान -

  • चुकीच्या पद्धतीने पचनासंबंधी आजार होतो.

  • चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास किडनीचे आजार होतात.

  • लिवरवर सूजन येणे तसे केस झडण्याच्या समस्या देखील असतात.

  • मधुमेह आणि ब्लड प्रेशरची समस्या देखील उद्भवू शकते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)