कांदा सॉक्समध्ये ठेऊन झोपल्याने काय होतात फायदे..नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पुणे: कांद्याचे चढते उतरते भाव सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणतात, कितीही महागला तरी कांदा हवाच. कांदा हा खूप गुणकारी आहे, त्याचे अनेक औषधी गुण आपल्याला माहित आहेत. जसं की कांद्याचा रस जर का आपण डोक्याला लावला तर केस गळत नाहीत किंवा कांदा हा शरिरातली उष्णता कमी करतो असे बरेच.. पण कांदा मोज्यात घालून झोपलो तर काय फायदे होतात..

पुणे: कांद्याचे चढते उतरते भाव सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणतात, कितीही महागला तरी कांदा हवाच. कांदा हा खूप गुणकारी आहे, त्याचे अनेक औषधी गुण आपल्याला माहित आहेत. जसं की कांद्याचा रस जर का आपण डोक्याला लावला तर केस गळत नाहीत किंवा कांदा हा शरिरातली उष्णता कमी करतो असे बरेच.. पण कांदा मोज्यात घालून झोपलो तर काय फायदे होतात..

जर का तुम्हाला ताप आला असेल किंवा थंडी वाजत असेल, तर त्यासाठी अगदी सोप्पा उपाय म्हणजे तुम्हा सरळ एक कांद्याची फोड झोपताना तुमच्या मोज्यात घालून झोपा, असा सल्ला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी तुम्हाला दिला असेल. बेशुध्द झाल्यावर कांद्याचा वास देतात इथपर्य़ंत ठिक आहे, पण मोज्यात कांदा घालून झोपणं हे कसं फायद्याचं आहे त्याविषयी तुम्ही वाचलं नसेल. 

लोकधारणा अशी आहे की तुम्ही कांदा कापून घराच्या आजूबाजूला ठेवला तर काही साथीच्या रोगांपासून तूम्ही दूर राहू शकता. कांद्याचा उग्र वास रोगाच्या जंतूंना दूर ठेवतो. जर का तुम्हाला ताप आला असेल किंवा थंडी वाजत असेल, तर त्यासाठी अगदी सोप्पा उपाय म्हणजे तुम्हा सरळ एक कांद्याची फोड झोपताना तुमच्या मोज्यात घालून झोपा त्याने तुमचा ताप कमी होईल. ताप कसा कमी होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?  तर त्याचे उत्तर असे आहे की कांद्यात सल्फर असते. ज्यावेळी आपण कांदा मोज्यात घालून ठेवतो त्या वेळी तो व्यक्तीच्या त्वचच्या संपर्कात आला की त्वचा तो सल्पर शोषून घेते आणि आपल्या रक्तातील अशुध्द घटक कमी होतात.

कांद्याविषयी असाही समज आहे की कांद्यात असणाऱ्या सल्फरच्या अंशामुळे आपण जर का कांदा कापून घरात ठेवला तर घरातली हवा शुध्द होते. तसेच इतर रोगांचे जीवाणू देखील मरतात. कांद्यात अॅसीडचे प्रमाण जास्त असल्यामुळे परिसर निर्जंतूक करण्यास मदत होऊ शकते. एखाद्या जखमेवर कांदा लावल्यास फायदा होईल. 

पण कांदा मोज्यात ठेऊन झोपल्याने काय होईल तसेच कांद्याच्या या इतर उपयोगांबद्दल आपल्याकडं आणखी तरी कसलंही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे कांदा त्वचेवर लावण्यापेक्षा तो खाण्यातच सध्यातरी जास्त फायदा आहे. कांद्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. तसेच कांदा कँन्सर, रक्तदाब तसेच रोगप्रतिकार प्रणाली साठी अत्यंत उपयुक्त असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Putting a Raw Cut Onion in Your Sock Cure Medical Ailments

टॅग्स