Cholesterol चं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करताय! पाच पदार्थ खाणे टाळा| High Cholesterol Foods To Avoid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cholesterol
Cholesterol चं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करताय! पाच पदार्थ खाणे टाळा| High Cholesterol Foods To Avoid

Cholesterolचं प्रमाण कमी करायचंय! 'हे' पाच पदार्थ खाणे टाळा

आपल्या शरीरासाठी (Body) कोलेस्टेरॉल आवश्यक असून शरीरातील पेशी निर्माण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. तुमचे यकृत शरीरासाठी आवश्यक असलेले कॉलेस्टेरॉल (Cholesterol) तयार करते. वनस्पतींवर आधारित अन्न तेलांसह नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल मुक्त असतात. हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत कोलेस्टेरॉलला निरोगी (Healthy) ठेवणे खूप महत्वाचे आहे. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्याने हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे. पण तरीही आपल्या आहारात (Food) काही प्रमाणात कोलेस्टेरॉल असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सकाळ, संध्याकाळच्या व्यायामाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम! अभ्यासात झाले स्पष्ट

ज्या पदार्थांत संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असतात, ते यकृताला सामान्यापेक्षा जास्त कोलेस्टेरॉल तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यामुशे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते. अनेक लोकांना कोलेस्टेरॉलची पातळी कळी कमी करावी, असा प्रश्न पडतो. त्यासाठी खालील पदार्थ खाणे टाळले तर बरं होईल. कारण हे पदार्थ तुमची निरोगी कोलेस्टेरॉल पातळी बिघडवू किंवा खराब करू शकतात.

हेही वाचा: घसा खवखवतोय, तीन घरगुती उपायांनी त्रास होईल कमी

butter

butter

हे पदार्थ खाणे टाळा Avoid These Foods To Control Cholesterol

१) लोणी किंवा बटर- दुग्धजन्य पदार्थांत संतृप्त चरबी असते. बटर, लोण्यात ती जास्त प्रमाणात असते. लोणी किंवा बटरचा वापर मध्यम प्रमाणात केलेला असावा. कारण तुमचे फॅट कोणत्याही आहारात फिट बसू शकेल. म्हणजेच तुम्ही ऑलिव्ह ऑईल, अक्रोड तेल यासारख्या पौष्टीक तेलाचा उपयोग करू शकता.त्याचप्रमाणे ब्रेडलाही त्याचे बटर किंवा जॅम लावता येऊ शकतो. किंवा तुम्ही नट बटरही वापरू शकता.

हेही वाचा: Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी

२) अल्फ्रेडो सॉस- अल्फ्रेडो सॉस हा बटर - पनीर एकत्र करून तयार होतो. ज्यात भरपूर प्रमाणात मैदा आणि संतृप्त चरबी असते. हा सॉस अनेकदा खाल्ला जाऊ शकतो. पण, त्यामुळे उच्च रक्त कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो. ज्यांना अनुवांशिक आजार आहे त्यांना तर यामुळे लवकर परिणाम होतो.

हेही वाचा: एका व्यक्तीला ओमीक्रॉनचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

soda

soda

3) सोडा- जे पदार्थ खराब कोलेस्टेरोल वाढवितात त्यांच्यामध्ये सोड्याचा समावेश आहे. जास्त साखरेचे सेवन आणि हृदयाच्या आरोग्यातील संबंधांमुळे अमेरिकन हार्ट असोसिएशनने साखरेचे प्रमाण दररोज 25 ग्रॅमपर्यंत ठेवण्याची शिफारस केली आहे. सोडा किती प्रमाणात खाता त्या पद्धतीवरून तुमच्या हृदयाच्या आरोग्यामध्ये मोठी भूमिका बजावतो. ज्यांना आधीच उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांच्यासाठी सोडा आणि साखरयुक्त कँडी कमी खाणे अधिक चांगले आहे.

हेही वाचा: डोळस व्हा! स्क्रीन टाईमच्या वाढत्या युगात अशी घ्या डोळ्यांची काळजी

popcorn

popcorn

४) मायक्रोव्हेव पॉपकोर्न

मायक्रोवेवमध्ये केलेले पॉपकॉर्न हे बटर आणि हायड्रोजनयुक्त तेलाने केले जातात. त्यात कॅलरी आणि आर्टिफिशियल फॅटच फक्त असतात. त्यामुळे असे पॉपकोर्न खाताना बटर घालू नका.

5) तळलेले चिकन- तळलेले चिकन हे तुमचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण बिघडवू शकते. जर तुम्हाला हा पदार्थ खायचाच असेल तर ऑलिव्ह किंवा अॅवोकाडो ऑईलचा वापर करून खावा. नाहीतर एयर फ्रायरचा उपयोग चिकन तळण्यासाठी करावा.

Web Title: Quit Eating These Five Foods If You Are Trying To Reduce Cholesterol Level

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..