पावसाळा हा व्हायरस व बॅक्टेरिआचा काळ; व्हिटॅमिन सी ने करा मात

पावसाळा हा व्हायरस व बॅक्टेरिआचा काळ; व्हिटॅमिन सी ने करा मात

नागपूर : पावसाळा चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्यासोबत घेऊन येतो. या ऋतूत अनेक आजार वाढतात. स्कीन इन्फेक्शन, स्कीन ॲलर्जी, पोटाच्या समस्या, सर्दी-खोकला, ताप, केसगळती, घशाचे इन्फेक्शन अशा कितीतरी समस्या या काळात होत असतात. कोरोनासोबत या आजारांसोबतही लढा द्यायचा आहे. तेव्हा तुमची इम्यूनिटी सिस्टीम चांगली असणे फार गरजेचे आहे. यावर तुम्ही ‘व्हिटॅमिन सी’ने मात करू शकता.

‘व्हिटॅमिन सी’ हे मायकोबॅक्टेरिअम स्मॅगमॅटीस नावाच्या नॉन-पॅथोजेनिक बॅक्टेरियाला मारते. शरीराला व्हिटॅमिन सी सतत मिळत रहावे यासाठी रोज कमीत कमी पाचशे मिली ग्रॅम व्हिटॅमिन सीचे सेवन करणे फार गरजेचे आहे. असे केल्याने केवळ सर्दी-खोकलाच नाही तर वेगवेगळ्या व्हायरसने होणाऱ्या इन्फेक्शनपासूनही तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

पावसाळा हा व्हायरस व बॅक्टेरिआचा काळ; व्हिटॅमिन सी ने करा मात
प्रसूती होताच बाळाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हातातून बाळ पडल्याचा मातेचा आरोप

शरीराला रोज मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज पडते. शरीराला हे जीवनसत्त्व योग्य प्रमाणात न मिळाल्यास अनेक आजार ग्रासतात. बहुतांश जीवनसत्त्व शरीरात तयार होत नसल्याने आहारातून किंवा फळांमार्फत ती घेणे गरजेचे ठरते. शरीरातील अवयवांची कार्ये सुरळीत चालू राहावीत, रोगप्रतीकारशक्ती चांगली राहावी यासाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडेंट असून कनेक्टिव टिश्यूजला चांगले बनवते आणि सांध्याला सपोर्ट देण्याचे कार्य करते. याव्यतिरिक्त कोलेजन, एल-कॅरनिटिन आणि शरीरातील काही न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास उपयुक्त आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो

व्हिटॅमिन सी हे शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे. हे शरीराच्या नैसर्गिक सुरक्षा प्रणालीला दुरुस्त करते. अँटीऑक्सिडेंटने इम्यूनिटी सिस्टीम चांगली राहते. हे सेल्सना फ्री रॅडिकल्स नावाच्या नुकसानकारक मॉलिक्यूल्सपासून वाचवते. जेव्हा हे फ्री रॅडिकल्स जमा होतात तेव्हा ते ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस निर्माण करतात. ज्याचा संबंध अनेक क्रॉनिक डिजीज म्हणजे जुन्या आजारांशी असतो. पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन केले तर रक्तात अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण साधारण तीस टक्के वाढते. यामुळे शरीर आजारांसोबत लढण्यासाठी तयार होते.

पावसाळा हा व्हायरस व बॅक्टेरिआचा काळ; व्हिटॅमिन सी ने करा मात
रसायनशास्त्र विभाग प्रमुखांची आत्महत्या, पतीच्या मृत्यूनंतर होता मानसिक तणाव

इम्यूनिटी सिस्टीम होते मजबूत

पावसाळाच्या दिवसांत व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाल्याने इम्यूनिटी वाढते. व्हिटॅमिन सी सर्वांत आधी व्हाइट ब्लड सेल्सची निर्मिती करते. याने शरीर इन्फेक्शनसोबत लढण्यास तयार राहते. व्हिटॅमिन सी फ्री रॅडिकल्सने सेल्सचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते. नियमित व्हिटॅमिन सीचे सेवन केले तर जखम लवकर भरण्यास मदत होते.

त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त

त्वचा चांगली ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरते. हे त्वचेवर लावल्याने अँसिडीक गुणांमुळे कोलेनन आणि इलॅस्टिकचे प्रॉडक्शन वाढते. ज्यामुळे त्वचेची हीलिंग प्रक्रिया वेगवान होत. यात अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. पावसाळा तर व्हायरस आणि बॅक्टेरिआचा आवडता काळ असतो. अशात जर तुम्ही व्हिटॅमिन सीचे सेवन केले तर अनेक फायदे होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com