माझा फिटनेस : भर ‘फ्री हॅंड’ वर्कआउटवर

My Fitness
My Fitness

राजकुमार राव हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशीलतेत आघाडीवर असलेलं नाव. बहुरंगी, बहुढंगी भूमिका साकारत राजकुमारनं आपला ठसा उमटवला आहे. ‘लव्ह, सेक्स और धोखा’सारख्या चित्रपटातून सुरुवात करीत त्यानं ‘काय पो चे’पासून चित्रपटसृष्टीत जम बसवायला सुरुवात केली. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘क्वीन’ अशा चित्रपटांतील त्याच्या छोट्या भूमिकाही चर्चिल्या गेल्या.

‘ट्रॅप्ड’, ‘बरेली की बर्फी’, ‘मेड इन चायना’ आदी चित्रपटांतून त्यानं आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्याच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेल्या ‘छलांग’ व ‘ल्युडो’ या चित्रपटांतील भूमिका गाजत आहेत. ‘छलांग’मध्ये त्यानं शाळेतील पीटीच्या शिक्षकाची, तर ‘ल्युडो’मध्ये मिथुन चक्रवर्तीची स्टाईल मारणाऱ्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. राजकुमार आपल्या फिटनेसबाबतीतही खूप जागरूक असतो आणि अशा विविधांगी भूमिका साकारताना हा फिटनेसच कामाला येतो, असं त्याचं स्पष्ट मत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या फिटनेसबद्दल तो सांगतो, '‘फारच थोड्या कमी जणांना हे माहिती आहे, की मी त्वायक्वांदो या खेळातील राष्ट्रीय चॅम्पियन आहे. या खेळाच्या सरावासाठी मी दररोज थोडा वेळ राखीव ठेवतो. मला प्रवास करायला आवडतं आणि चित्रीकरणाच्या निमित्तानं मला भरपूर प्रवासही करावा लागतो. या परिस्थितीत दररोज जिमला जाऊन व्यायाम करणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळंच मी जिमला न जाता फिट राहण्याचा माझा फंडा विकसित केला आहे. मी फ्री-हॅंड वर्कआउट करण्यावर विशेष भर देतो. पुश-अप्स, डिप्स, स्क्वॉट्स, पोटाचे विविध व्यायाम, लेग लिफ्ट, साइड बेंड्स हे सर्व फ्री-हॅंड व्यायामप्रकार मी दररोज करतो व त्यामुळं मला जिम आणि त्यातील उपकरणांची गरज भासत नाही. मी ‘बोस - डेड ऑर अलाइव्ह’ या चित्रपटासाठी १२ किलो वजन वाढवलं होतं व चित्रपटाचं चित्रीकरण संपताच ते उतरवलं! हे मला नियमित व्यायामाच्या सवयीमुळंच शक्य झालं.’

राजकुमारनं व्यायामाबरोबर खाण्याच्या सवयीही नियंत्रित ठेवल्या आहेत. घरच्या खाण्यावर त्याचा विशेष भर असतो. पार्टीला जाणं व तिथलं खाणं-पिणं तो शक्यतो टाळतो. नाश्‍ता, सकाळचं व रात्रीचं जेवण यामध्ये तो प्रोटीनयुक्त आहाराला अधिक महत्त्व देतो. ‘दररोज तीन तास भरपूर व्यायाम केल्यानंतर प्रोटीनयुक्त अन्न ही शरीराची गरज असते. मी जिभेचे चोचले न पुरवता, कोणता पदार्थ खातो आहे, याचा विचार न करता प्रोटीनयुक्त आहार घेतो. माझं जिममध्ये न जाता शरीर मेंटेन ठेवण्याचं हेच मोठं रहस्य आहे...’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com