काय आहे उचकी लागण्यामागचे शास्त्रीय कारण? 'हे' उपाय केल्यास लवकर मिळेल आराम

टीम ई सकाळ
Thursday, 4 March 2021

आपल्या शरीरात डायाफ्राम नावाची मांसपेशी असते. ते हृदय आणि फुफ्पुसांना पोटापासून वेगळे करत असतात. श्वासामध्ये देखील याची महत्वाची भूमिका असते. यामध्ये ज्यावेळी संकुचन होते तेव्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये हवेसाठी जागा तयार होते.

नागपूर : उचकी लागणे ही सामान्य बाब आहे. कारण काही वेळानंतर उचकी ही आपोआप बंद होत असते. मात्र, कधी कधी कितीही उपाय करून उचकी थांबत नाही. त्यामुळे या उचकीला थांबवायचे असेल तर त्यासाठी तुमच्या घरातच उपाय दडला आहे. तर पाहुयात कोणते आहेत ते उपाय...

उचकी म्हणजे काय?
आपल्या शरीरात डायाफ्राम नावाची मांसपेशी असते. ते हृदय आणि फुफ्पुसांना पोटापासून वेगळे करत असतात. श्वासामध्ये देखील याची महत्वाची भूमिका असते. यामध्ये ज्यावेळी संकुचन होते तेव्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये हवेसाठी जागा तयार होते. ज्यावेळी डायफ्राम मांसपेशीचे वारंवार संकुचन होत असते तेव्हा आपल्याला उचकी लागते. त्यावेळी जो आवाज येतो तो ग्लोटिक्स लवकर बंद झाल्यामुळे येत असतो.

उचकी लागण्यामागचे कारण काय?
उचकी लागण्याचे नेमके कारण सांगणे कठीण आहे. मात्र, गरजेपेक्षा जास्त खाणे, मसालेदार पदार्थ आणि घाईघाईत जेवण करणे. तसेच अल्कोहोलिक ड्रिंक्स, स्मोकिंग, तणाव, भीती, अतिउत्साह या सर्व कारणांमुळे उचकी लागू शकते.

हेही वाचा - बापरे! गृहविलगीकरणातील रुग्णाचा मुक्तसंचार, तपासणी पथकाकडून दंडात्मक कारवाई

उचकीवर उपाय -

  • उचकी लागल्यानंतर काही वेळातच ती आपोआप बंद होत असते. जर उचकी जास्त वेळपर्यंत असेल तर त्यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
  • थंड पाणी प्या किंवा बर्फ तोंडात ठेवा.
  • दालचिनीचा एक तुकडा तोंडात ठेवला तरी उचकीपासून सुटका मिळेल.
  • लंबा श्वास घ्या आणि होत असेल तितका वेळ रोखून धरा. हीच प्रक्रिया दुसऱ्यांदा करा. 
  • पेपरबॅगमध्ये तोंड घालून श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. त्यामुळे श्वसनक्रिया नॉर्मल होण्यास मदत होते.
  • लसूण, कांदा आणि गाजरच्या रसाचा सुगंध घेतल्यास आराम मिळतो.
  • काळी मिरीची बारीक भुकटी करून दोन ग्राम चूर्ण मधासोबत खा.
  • जीभेच्या खाली साखर ठेवून त्याला चोखत राहा.
  • जमीनीवर झोपून गुडघ्यांना आपल्या डोक्याकडे ओढा. त्यामुळे डायाफ्राममधील बिघाड दुरुस्त होऊ शकतो.
  • २० ग्राम लिंबूच्या रसामध्ये ६ ग्राम मध आणि थोडे काळे मीठ घालून ते खाल्ल्याने उचकी बंद होते.

हेही वाचा - वाद गेला विकोपाला; पत्नी तक्रार द्यायला ठाण्यात गेली, इकडे पतीने रागात केली चिमुकलीची हत्या

घरगुती उपयांनी उचकी थांबत नसेल तर...
कधी कधी ४८ तास देखील उचकी तुम्हाला त्रस्त करू शकते. मात्र, असे वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. यावर घरगुती उपाय काम करणार नाहीत. तुम्हाला नेहमी उचकी लागत असेल तर अस्थमा, न्युमोनिया किंवा श्वासासंबंधी आजार होऊ शकतात. अनेकदा हृदयामध्ये काही बिघाड झाला असेल तरी उचकी लागू शकते. पोटावर सूजन, गॅस होणे, हाइटस हार्निया यामुळे देखील उचकीची समस्या सुरू होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reasons behind hiccups home remedies to get relief nagpur news