esakal | बापरे! गृहविलगीकरणातील रुग्णाचा मुक्तसंचार, तपासणी पथकाकडून दंडात्मक कारवाई

बोलून बातमी शोधा

amravati corporation against people quarantine people who violate rule}

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मात्र, कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. ज्योती कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला हा रुग्ण कोरोनाबाधित असून त्याला विनंतीहून गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

बापरे! गृहविलगीकरणातील रुग्णाचा मुक्तसंचार, तपासणी पथकाकडून दंडात्मक कारवाई
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णाने नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेच्या पथकाने त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. त्याला पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला. अशाप्रकारची कारवाई करण्यात आलेला शहरातील तो तिसरा रुग्ण आहे. या रुग्णाला आता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हेही वाचा - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत...

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मात्र, कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. ज्योती कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला हा रुग्ण कोरोनाबाधित असून त्याला विनंतीहून गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याने महापालिकेच्या कोरोना वॉररूममध्ये भरून दिलेल्या हमीपत्रात विलगीकरण कालावधीत घराबाहेर न पडण्याची हमी दिली आहे. वॉररूमचे नोडल अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी या रुग्णाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो घरी नसल्याचे आढळून आले. तपासणी पथकाने त्याचा शोध घेतला असता तो स्वतःच्या दुचाकीने फिरत असल्याचे आढळले. इतकेच नाही तर तो चक्क पथकाला घरी दुचाकीहून येतानाच भेटला. त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्याला पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला. अशाप्रकारची कारवाई करण्यात आलेला तो शहरातील तिसरा रुग्ण आहे.

हेही वाचा - ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

नागरिकांनी माहिती देण्यासाठी पुढे यावे -
लक्षण नसलेल्या रुग्णांना त्यांच्या सुविधेसाठी गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. त्यांच्याकडून बंधपत्रही लिहून घेतले जाते. मात्र, असे असतानाही कुणीही गृहविलगीकरणाचा भंग करून इतरांचा जीव धोक्‍यात घालून साथीचा प्रादुर्भाव वाढवणार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे कुठेही झाल्याचे आढळल्यास अमरावतीकरांनी महापालिकेच्या पथकांना माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.