रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन- भाग १

कायम रिझर्ववर राहिल्यामुळे आपला ताणतणाव वाढतो.
रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन- भाग १
Updated on

'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज अनेकांनी पाहिली असेल. या सीरिजमधील मनोज वाजपेयीच्या कंपनीतील मॅनेजर आठवतोय का? हा मॅनेजर त्याला "Don't be a minimum guy" असं सतत-सतत बजावत असतो. ज्या परिस्थितीत तो हे बोलत होता ती वेळ व परिस्थिती जरी चुकीची असली तरीदेखील या वाक्यात तथ्य आहे. आपण सुद्धा दैनंदिन आयुष्यात असंच मिनिमम म्हणजे जेमतेम काम करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणतं काम कमी वेळात होईल याचा आपण विचार करत असतो. तोच पुढे जाऊन आपल्या स्वभावाचा भाग बनतो. त्यामुळे या मुद्द्यावर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. (Recovery-and-Rehabilitation-Part-1-health-yoga-fitness)

आपल्या कामातील इंवॉल्व्हमेंट, नात्याला दिलेला वेळ, वाचन, व्यायाम या सगळ्या गोष्टींकडे आपण पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे 'आत्ता पुरतं' अशी वृत्ती वेळीच सोडून दिली पाहिजे. या वृत्तीमुळे आपण आपल्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत कधीच पोहोचत नाही आणि, निकडीचा प्रसंग आला की आपली दाणादाण उडते. कारण आपण पूर्ण ताकदीनिशी तयारच नसतो. Sweat more in training, bleed less in war या म्हणीप्रमाणे आपण तयारी तगडी ठेवली तर खऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपली शक्ती अपुरी पडत नाही.

रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन- भाग १
मार्जरासन का करावे? जाणून घ्या फायदे

कायम रिझर्ववर राहिल्यामुळे आपला ताणतणाव वाढतो. सोबतच शारीरिक यंत्रणा कोलमडण्याची शक्यता अधिक असते. उदाहरणार्थ आजारी पडेपर्यंत शरीराचा दुरुपयोग करणे, मग औषध घेऊन वेळ मारून नेणे. मग जरा बरे वाटायला लागले की पुन्हा पूर्ववत जीवनशैली सुरू. औषधांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम, त्यांचा विविध आंतर इंद्रियांवर पडणारा ताण आणि आजारपणातून पूर्णपणे बाहेर येऊन आपल्या आतील यंत्रणेचे पुनर्वसन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मागे एकदा मी म्हणाले होते तसं आपल्या नकळत आपण जखमी व थकलेल्या सैनिकाला पुन्हा युद्धावर पाठवत असतो आणि त्याने मोठी कामगिरी बजावावी अशी अपेक्षा धरतो. त्यामुळे जेमतेम काम करण्याचा विचार सोडा आणि तुमच्यातील क्षमता ओळखून त्या पद्धतीने काम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com