इनर इंजिनिअरिंग:निराशेने काम होणार नाही...

इनर इंजिनिअरिंग:निराशेने काम होणार नाही...

प्रत्येकासाठी २०२० हे वर्ष आयुष्यात उलथापालथ घडविणारे वर्ष म्हणून या पिढीवर कधीही न विसरू शकणारी छाप सोडून जाईल. गेल्या शतकात घडलेली युद्धे, साथीच्या रोगांचा आणि नैसर्गिक आपत्तींकडे पाहिल्यास एकविसाव्या शतकाची पहिली वीस वर्षे आशीर्वादच म्हणावी लागतील. विनाशकारी पर्यावरणीय संकेत उलगडत असताना, जेव्हा आपण आपले सर्व प्रयत्न भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाला जपण्यावर केंद्रित करण्याची नितांत गरज असताना, ही कोरोनाची महामारी आपल्या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा धुळीस मिळवत आहे. 

मात्र, ही महामारी आपलं आयुष्य अस्ताव्यस्त करू शकत असली, तरीही ती अजूनही आपण हाताळू शकतो. नागरिकांच्या जाणीवपूर्वक आणि जबाबदार कृतीनं आपण या विषाणूचा नायनाट करू शकतो. बऱ्याच लोकांनी या महामारीची तुलना दुसऱ्या महायुद्धाशी केली आहे. कारण, त्यांनी ते युद्ध पाहिलं नाहीये! आपण सर्वजण थोडाफार योग आणि ध्यानधारणेत प्रशिक्षित असलो असतो आणि फक्त आपले डोळे मिटून चौदा दिवस एका ठिकाणी शांतपणे बसून राहिलो असतो, तर ही महामारी कधीच संपली असती. दुसरं  महायुद्ध हे एका वेगळ्याच स्वरूपाचं होतं; त्या प्रकारची भयानकता आज आपल्याला दिसून येत नाही. तुमचं घर अजूनही शाबूत आहे, कोणीही तुमच्यावर बॉम्बहल्ला केला नाही. मात्र, आजची परिस्थिती हाताळण्यासाठी लोकांनी त्यांचा मानसिक पैलू पुरेसा मजबूत केला नाहीये. दुष्काळ, युद्धं, साथीचे रोग, ज्वालामुखीसारखी नैसर्गिक आपत्ती आणि भूकंप प्रत्येक पिढीमध्ये घडले आहेत.

माणसांना आपण या प्रकारे मजबूत करायला हवं; जेणेकरून त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा प्रसंग येऊ देत, ते त्यातून सहजपणे पार होऊ शकतील. आपलं आरोग्य आणि आपल्या नश्वर स्वरूपाला या विषाणूनं आव्हान दिलं आहे आणि अशा कठीण परिस्थितीत आपण स्वत:ला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बिकट स्थितीत घेऊन जात आहोत. त्यात भर म्हणून आज आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यक्ती, एक समाज आणि राष्ट्र म्हणून आपण ही शपथ घेतली  पाहिजे, की आपण आपलं मानसिक आरोग्य ढळू देणार नाही किंवा आत्महत्या होऊ देणार नाही. या समयी आपण धैर्यानं, शहाणपणानं आणि हुशारीनं कार्य केलं पाहिजे.

स्वत:ला एक उत्तम मनुष्य बनविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न तुम्ही केलेच पाहिजेत. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि तुमचं कार्यकौशल्य, यांच्या बाबतीत तुम्ही सध्या ज्या स्तरावर आहात त्यापेक्षा दहा टक्के अधिक उत्तम होण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. यासाठी आम्ही बरीच ऑनलाइन साधनं नि-शुल्क उपलब्ध करून देत आहोत. हा विषाणू काही काळ आपला प्रभाव दाखवून देईल. त्याचा प्रभाव संपल्यावर आपण आपला प्रभाव दाखविण्यासाठी सज्ज असलं पाहिजे. प्रतिक्रिया करण्याऐवजी प्रतिसाद देण्याची मानवी क्षमता, हा यावर एक अतिशय प्रभावी उपाय आहे, फक्त या महामारीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठीच नव्हे, तर एक अधिक सुसंस्कृत आणि शाश्वत जगासाठी नवीन शक्यता निर्माण करण्यासाठीसुद्धा. हेही खरंय, शक्यता आणि वास्तविकता यांच्यात एक अंतर आहे. नववर्षात आपल्या सर्वांमध्ये धैर्य, वचनबद्धता आणि चैतन्य भरभरून वाढू दे; जेणेकरून आपण स्वत-ला उत्तम मनुष्यात घडवू शकू आणि त्यायोगे एक उत्तम जग घडवलं जाऊ शकेल.

निराशेनं काम होणार नाही, तर समर्पणानं सकल चराचर सृष्टीचं कल्याण आपण साधू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com