इनर इंजिनिअरिंग : जागतिक आर्थिक व्यवहार

sadguru-isha-foundation
sadguru-isha-foundation

जगातील आर्थिक व्यवहार हा मानवाइतकाच जुना आहे. एक ढोबळ देवाणघेवाण म्हणून सुरुवात होऊन आज जागतिक अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम, अतिशय गुंतागुंतीची आणि शेवटी आपल्या पृथ्वीसाठीच विनाशकारी बनली आहे. 

आध्यात्मिकता देखील जगात मानावाइतकीच जुनी आहे आणि आध्यात्मिक प्रक्रिया देखील कालानुरूप विकसित झाली आहे. अध्यात्म तुमच्या आंतरिक अस्तित्वाचे उत्तमरीत्या हाताळण्याबद्दल आहे आणि अर्थशास्त्र हे तुमच्या बाह्य परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याबद्दल आहे. ज्या संस्कृतींनी त्यांचे आंतरिक कल्याण आणि बाह्य जग यामध्ये योग्य तो समतोल साधला, त्या भरभराटीस आल्या. खरी आध्यात्मिकता तेव्हाच घडेल जेव्हा मनुष्य शांत, समाधानी आणि आनंदी असेल आणि यावरून कदाचित तुम्हाला असे वाटेल की समृद्ध राष्ट्रांमधील लोक या स्थितीत असतील. पण तसे नाही. आज जगभर सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये आपण पाहतो अनिवार्य कृतीशीलता. आज लोकांना त्यांना नक्की काय हवेय हेच माहिती नाही, अगदी साध्या रोजच्या गोष्टी, किती जेवावे किंवा त्यांना किती पैसे किंवा संपत्ती हवीय. कधी थांबायचे हेच त्यांना माहित नाही. आनंदाच्या प्राप्तीसाठी निरंतर धडपडत आहेत. तरीही, तुम्ही आतून शांत समाधानी असता ,तेव्हाच तुम्ही आर्थिक व्यवहार यापरीने हाताळाल जे केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर इतर प्रत्येकासाठी हितावह असेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अध्यात्म आर्थिक व्यवहाराइतके संघटित कधीच नव्हते. आध्यात्मिक प्रक्रिया संघटित केल्या गेल्यावर त्यांना धर्म संस्थांमध्ये बदलले गेले. पृथ्वीवरील सर्व धर्म एक आध्यात्मिक प्रक्रिया म्हणूनच सुरू झाले; परंतु धर्मांनीच जगात अतोनात दुःख आणि त्रास दिला आहे. आज अर्थशास्त्रही बिघडलेल्या अवस्थेत आहे. एक संघटित अर्थव्यवस्था प्रत्येकासाठी मोठ्या संधी आणि सर्वांगीण कल्याण घडवून आणेल असे मानले जाते, परंतु गरीब आणि श्रीमंत यांच्यात असमानता आज इतकी प्रचंड वाढली आहे की जणू ते वेगवेगळ्या ग्रहांवर राहत आहेत असे वाटते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज अध्यात्म आणि अर्थशास्त्र या दोन्हींकडे योग्य भर दिला जात नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने सोई-सुविधा निर्माण केल्या आहेत, पण यामुळे आपण अधिक आनंदी झालो आहोत का? नाही. म्हणून आज अधिकाधिक लोक अध्यात्माचा शोध घेत आहेत, कारण आर्थिकदृष्ट्या लोकांनी बाह्य सुख-सुविधा निर्माण करण्यात प्रचंड प्रगती केली असली तरी, आंतरिक सुख-समाधान आणि आनंद त्यांना लाभला नाही. आंतरिक सुख-समाधान लाभेपर्यंत बाह्य जगाचे व्यवहार आणि व्यवस्थापन ओबडधोबड असेल. आपण एक आध्यात्मिक जीव आहोत आणि या जगात अस्तित्वात राहण्यासाठी आपण आर्थिक व्यवहारात गुंतलो आहोत. खरोखर गरजेचे आहे ते साध्य करण्याऐवजी आपण इच्छापूर्तीसाठी सक्ती करत असू, तोपर्यंत आपण प्रगती करणार नाही. येत्या काही वर्षांत, राजकीय नेत्यांपेक्षा आर्थिक नेते अधिक प्रभावी होतील. म्हणून आर्थिक नेत्यांनी देखील माणसांच्या कल्याणाच्या दृष्टीने कार्य करणे महत्त्वाचे आहे; तेव्हाच आपण आपल्या बाह्यकल्याणाची खात्री करू शकतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com