इनर इंजिनिअरिंग : कंटाळवाणं वाटतं?

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
Tuesday, 20 October 2020

अध्यात्माचा मार्ग अवलंबण्याचे महत्त्व एवढेच आहे, की तुम्ही तुमच्या शरीर आणि मनामुळे दबले जात नाही. तुम्ही तुमचे शरीर आणि मन तुम्हाला हवे त्या ठिकाणी जाण्यासाठी वापरता.

तुमचा मृत्यू इतर काही कारणाने झाल्यास ठीक आहे. पण, कंटाळा तुमच्या मृत्यूचे कारण असल्यास ती तुमच्या आयुष्यात घडलेली सगळ्यात वाईट घटना असेल! जीवनाच्या अलौकिक उत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्ही इच्छुक असल्यास तुम्हाला कंटाळा कसा काय येईल? अस्तित्व तुम्ही पूर्णपणे जाणले आहे आणि आता जाणून घेण्यासारखे काही राहिले नसल्यास तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, हे मी समजू शकतो. पण, खरे पाहता तुमच्या शरीरातली एक साधी पेशी कशी कार्य करते एवढेसुद्धा माहीत नाही, एक अणू म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही; तर मग तुम्हाला कंटाळा कसा काय येऊ शकतो? 

कंटाळणे हा मनाचा स्वभाव आहे. कारण, काल काय घडले, ते आपल्या मनामध्ये फक्त एक आठवण म्हणून राहते. संपूर्ण ब्रह्मांडात काल काय घडले हे कुठेही लिहून ठेवलेले नाही. ते फक्त आपल्या स्मृतीत असते. शेवटी ते तुमचे मन आहे, तर मग तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही का घडवत नाही? तुम्ही बाहेरची परिस्थिती बदलल्यास तुमच्यासाठी काहीही बदलणार नाहीये. समजा तुम्हाला तुमच्या ऑफिसचा कंटाळा आला आणि उद्या तुम्ही ते बदलले; त्यानंतर तुम्हाला तुमचे कुटुंब बदलावेसे वाटेल. ही एक कधी न संपणारी प्रक्रिया आहे. एकुलता एक बदल प्रभावी ठरतो आणि तो म्हणजे – तुम्ही स्वतः बदलल्यावर सर्वकाही बदलते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर, जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे, तुम्ही काहीतरी उपाय करून, कुठलाही उपाय असेल, तुमचे मन ध्यानस्थ ठेवणे तुम्हाला जमले नाही, तर मन कंटाळते. कारण, ते फक्त काल काय घडले, केवळ ह्याच चौकटीतून कार्य करते. मन स्मृतीतून कार्य करते, कल्पनासुद्धा स्मृतीतून कार्य करते. काल काय  घडले, ही स्मृती आहे. जे काल घडले तेच आजही घडतेय. म्हणून, तुम्हाला वाटतेय तुम्ही पुन्हा तेच तेच करताय. दररोज सूर्य उगवतो. त्याच्या उगवण्यात काही पुनरावृत्ती आणि कंटाळवाणे नाहीये. पण, तुम्हाला आयुष्य कंटाळवाणे वाटते. कारण, तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम झाला आहात. मन तुमचा गैरवापर करतेय आणि ते तुमचा पूर्णतः गैरवापर करून तुमचा सर्वनाश करेल. कारण, तसे करण्यासाठी ते सक्षम आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला अतिशय कंटाळवाणे वाटतेय आणि त्याच्याखाली तुम्ही दबले गेले आहात, याचा अर्थ जीवनाला तुम्ही बगल दिली आहे. कारण, तुम्हाला कंटाळा येतो तो फक्त विचारांमुळे. तुम्ही जीवनाच्या प्रक्रियेला कंटाळू शकत नाहीत. कारण, ती प्रचंड उत्साहाने आणि गुंतागुंतीचीही आहे. आयुष्य इतके बहुआयामी आहे, की कंटाळा करायला जागाच नाही. तुमच्या मनाच्या तार्किक चौकटीपेक्षा अतिशय विशाल आणि अद्‍भुत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या मनाचे सर्व पैलू आणि त्याची संपूर्ण क्षमता वापरूनही तुम्ही जीवनाची प्रक्रिया समजू शकत नाही. तुम्ही हजारो वर्षे जगलात तरीही तुम्हाला ती कळणार नाही आणि तरी काय झाले, याबद्दल तुम्ही बुचकळ्यात पडाल. तुम्ही जीवनाच्या मूलभूत पैलूंबद्दल अजूनही तुम्हाला हरविल्यासारखे  वाटेल. कारण, ते कांद्याच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. एकामागून एक तुम्ही त्याला सोलत राहता आणि ते तसेच अखंडपणे चालूच राहते. 

तुम्हाला कंटाळवाणे वाटत असल्यास हीच ध्यान करण्याची वेळ आहे. अध्यात्माचा मार्ग अवलंबण्याचे महत्त्व एवढेच आहे, की तुम्ही तुमच्या शरीर आणि मनामुळे दबले जात नाही. तुम्ही तुमचे शरीर आणि मन तुम्हाला हवे त्या ठिकाणी जाण्यासाठी वापरता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadguru isha foundation writes article

Tags
टॉपिकस
Topic Tags: