इनर इंजिनिअरिंग : चांगलं आणि वाईट यांची वास्तविकता

इनर इंजिनिअरिंग : चांगलं आणि वाईट यांची वास्तविकता

बलरामाने सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करत, मथुरा सोडून जाताना कृष्णाला प्रश्न विचारला, ‘‘आपल्यावर संकटांचा हा भडिमार होत आहे आणि तेही तू आमच्यासोबत असताना, हे असं का?’’ याला कृष्णाचे उत्तर होते, ‘‘आयुष्य तुझ्या अपेक्षेप्रमाणे घडत असताना तू तक्रार करत नाहीस. कारण, काही विशिष्ट परिस्थितींना तू चांगल्या म्हणून पाहतोस आणि इतरांना वाईट, किंवा काही विशिष्ट गोष्टी प्रिय म्हणून पाहतोस काही अप्रिय; तर जीवन ते जसं आहे तसं पाहण्याऐवजी तू हा प्रश्न विचारतोयस की ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात का घडतायत.’’

ज्या क्षणी तुम्ही आध्यात्मिक प्रवाहात प्रवेश करता त्या वेळी तुमची आंतरिक स्थिती अतिशय जलद गतीने घडू लागते; तुमच्या अंतिम ध्येयाकडे जाण्याची तुम्हाला घाई असते. त्यासाठी तुम्हाला शंभर जन्म वाट पाहायची नाहीये; म्हणून सर्व काही वेगात घडतंय. तुम्ही एक गोष्ट चांगली आणि दुसरी वाईट म्हणून विभागणं बंद केल्यास जगात चांगलं आणि वाईट यासारखं काहीही असणार नाही. जीवन अतिशय तीव्रतेनं घडत आहे, एवढंच. काही लोक त्याचा आनंद लुटतात, काही त्याचा त्रास करून घेतात. जीवन जशी वास्तविक सृष्टीरचना आहे, त्याबद्दल मी बोलतोय.

आज बहुतेक लोक पुष्कळ गोष्टींना जीवन, असं समजतात. खरं पाहता त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नाहीये. ज्या लोकांकडे कार नाही त्यांना वाटतं स्वतःची कार असलेले लोक भाग्यवान आहेत. हो निश्चितपणे कार एक आरामदायी आणि सोईस्कर साधन आहे. परंतु, हे काही मोठं भाग्य नव्हे. जगात मोटारीच नसत्या, तर कोणालाही गाडी घेण्याची इच्छा झाली नसती. स्वतःची तुलना इतरांशी करणे, हीच मूळ समस्या आहे. याचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नाही, ही एक मानसिक  अवस्था आहे. सर्व मानवी दुःख ह्या मानसिक वेडेपणातून निर्माण होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक आध्यात्मिक व्यक्ती आयुष्यातील घटनांकडे चांगल्या आणि वाईट म्हणून पाहत नाही, आयुष्य किती तीव्रतेनं घडत आहे, हा एकच ध्यास त्यांना लागलेला असतो. चांगलं आणि वाईट ह्या सामाजिक संकल्पना आहेत; त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही समता राखल्यास तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना एक पाऊल पुढं घेऊन जाईल. हे तुमच्या ध्यानात आलं नाही, जर तुमच्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीमुळं प्रभावित होत राहिलात, तर मग ज्या वेगानं आयुष्य घडत आहे; त्यामुळं तुम्हाला वाटेल की तुमचं जीवन गोंधळून गेलंय, पण ते तसं नाही.

तुम्हाला आध्यात्मिक व्हायचं आहे, म्हणजे खरं पाहता याचा अर्थ तुम्ही सध्या जसे आहात त्याचा तुम्हाला अंत करायचा आहे. हेच सकारात्मक मार्गानं सांगायचं झाल्यास तुम्ही मुक्ती शोधत आहात. तुम्ही तुमचं परम स्वरूप शोधत आहात; तुम्ही देवाचा शोध घेत आहात. तुम्हाला अनंत, अमर्याद व्हायचं आहे. आपल्याला अनंत, अमर्याद व्हायचं आहे, तेव्हा तुम्ही आत्ता जसे आहात, त्याचा अंत करायचा आहे. एकदा तुम्ही अशी इच्छा व्यक्त केली आणि आवश्यक ती ऊर्जा तुमच्यात गुंतविली गेल्यास अशा काही गोष्टी घडू लागतील ज्या तुम्ही आत्ता जसे आहात, त्याचा नाश करतील. याचा अर्थ असा नाही, की तुमच्या बाबतीत नकारात्मक गोष्टी घडतील. आयुष्य अतिशय जलद गतीनं घडत जाईल, एवढंच...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com