esakal | इनर इंजिनिअरिंग : आसन करताना श्‍वासाचे महत्त्व

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : आसन करताना श्‍वासाचे महत्त्व

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

तुमचे मन आणि तुमच्या भावनांना लक्ष एकाग्र करण्यासाठी कोणत्याही एका गोष्टीची गरज आहे. जर ते दोन्ही एकाच गोष्टीवर लक्ष एकाग्र करून राहिले, तर तुम्ही जास्तीत जास्त आरामदायक स्थितीत असाल. तुमचे शरीर एका दिशेने, तुमचे मन दुसऱ्या दिशेने आणि तुमच्या भावना एका वेगळ्याच दिशेने जात असल्यास तुम्हाला पुष्कळ संघर्ष करावा लागेल. समजा तुमची एक नोकरी आहे ज्यामध्ये तुम्ही खूप गुंतलेले आहात, घरी तुमचे कुटुंब आहे, आणि बाहेर एका प्रेमप्रकरणातही गुंतला आहात. तर तुम्ही पाहाल, तुम्ही एका भयंकर गोंधळात अडकून पडाल - कधीच तुम्ही शांत-निवांत असू शकणार नाही. केवळ तुमचे शरीर, मन आणि भावना एकाच दिशेने एकाग्र असतील, तरच तुम्ही पूर्णपणे आरामात असू शकाल.

कोणतीच गोष्ट किंवा कोणतीही व्यक्ती – इतके की तुमची नोकरी, तुमची संपत्ती, तुमचे कुटुंब आणि तुमचे प्रेम प्रकरण तुमच्या श्वासाइतकं विश्वासार्ह नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तो तुमच्याबरोबर आहेच. तुमचे मन लक्ष एकाग्र करण्यासाठी श्वास ही सर्वांत स्थिर आणि खात्रीशीर गोष्ट आहे. एखादे आसन करताना तुमचे मन तुम्ही तुमच्या श्वासावर केंद्रित नाही केले, तर ते इकडे-तिकडे, सगळीकडे भटकत राहील. म्हणून तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष एकाग्र केले पाहिजे. मी तुमचा श्वास काढून घेतल्यास तुम्ही आणि तुमचे शरीर अलग व्हाल. हा तुमचा श्वासच आहे, जो तुम्हाला व तुमच्या शरीराला एकत्र धरून ठेवतो आहे. योगामध्ये श्वासाला ‘कुर्म नाडी’ असे म्हणतात, जी एका धाग्यासारखी आहे जी तुम्हाला आणि तुमच्या शरीराला एकत्र बांधून ठेवते आहे.

हेही वाचा: हसण्यासाठी जगा : ‘हास्याचं बटन, प्रकाशमान मन’!

तुमच्या श्वासाबरोबर तुम्ही निरंतर राहिलात, त्याच्याबरोबर तुम्ही खोलवर प्रवास केल्यास एके दिवशी तुम्हाला कळेल, तुमचे शरीर आणि तुम्ही कुठे जोडलेले आहात. एकदा तुम्हाला हे कळाल्यावर तुम्ही तुमचे शरीर तुमच्यापासून जरा अंतरावर धरू शकाल आणि तुमचे सर्व त्रास आणि दु:खे नाहीशी होतील. तुमचे सर्व क्लेश, त्रास आणि दु:ख हे तुमच्या शरीरातून आणि मनातून निर्माण होतात. तुम्ही तुमचे शरीर आणि मन या दोघांपासून अंतर निर्माण करू शकल्यास तोच तुमच्या सर्व दु:खांचा अंत आहे. आणि केवळ दु:खाची भीती नसते, तेव्हाच मनुष्य त्याच्या जीवनाचा सर्वार्थाने ठाव घेण्याचे धाडस करू शकेल. तुमच्या श्वासाबरोबर राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि या संदर्भात एक गोष्ट म्हणजे तुमच्या मनाला एक स्थिर

जोडीदार मिळेल ज्याच्याबरोबर ते राहू शकेल. इतर कुणीही तुम्हाला सोडून जाऊ शकतात पण तुमचा श्वास मात्र तुमची साथ तुम्ही मरेपर्यंत सोडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुम्ही आणि तुमचे शरीर एकत्र जोडलेले आहात. तुम्हाला तुमचे जीवन

तुमच्या अनेक सक्तीपूर्वक पैलूंनी ठरवले जाऊ नये, असे वाटत असल्यास, तुम्हाला तुमचे जीवन तुमच्या इच्छेनुसार घडवायचे किंवा पूर्ववत करायचे असल्यास तुम्हाला ह्या ठिकाणाचा ठाव असणे महत्त्वाचे आहे.