esakal | इनर इंजिनिअरिंग : दक्षिणायन : शुद्धीकरणाचा काळ
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : दक्षिणायन : शुद्धीकरणाचा काळ

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

योग संस्कृतीत, जून महिन्यात येणारी उन्हाळी संक्रांत दक्षिणायनाची सुरूवात चिन्हांकित करते, याचा अर्थ पृथ्वी भोवतालच्या आकाशात सूर्य या तिच्या उत्तर गोलार्धात दक्षिणेकडून आपले संचलन करू लागतो. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात येणारी हिवाळ्यातील संक्रांत, म्हणजे उत्तरायण किंवा सूर्याच्या उत्तरेकडील संचलनास दर्शवते. डिसेंबरमधील उत्तरायणाच्या सुरूवातीपासून ते जूनमधील दक्षिणायनाच्या सुरूवातीपर्यंतचा वर्षाचा अर्धा भाग कैवल्य पाद किंवा ज्ञान पाद म्हणून ओळखला जातो. दक्षिणायनाच्या सुरूवातीपासून ते उत्तरायणाच्या सुरुवातीपर्यंतचा वर्षाचा अर्धा भाग साधना पाद म्हणून ओळखला जातो. साधनेच्या दृष्टीने दक्षिणायन शुद्धीकरणासाठी आहे, उत्तरायण आत्मज्ञानासाठी आहे.

माणूस या ग्रहावर होणाऱ्या कुठल्याही घडामोडींपासून सुटू शकत नाही - मी पर्यावरणीय बाबींचा उल्लेख करीत नाही - कारण ज्याला आपण ‘मी’ असे म्हणून संबोधता, तो या ग्रहाचाच एक तुकडा आहे - पृथ्वी म्हणून जे काही आहे त्यापेक्षा तो जरा अधिक संवेदनशील आणि ग्रहणशील आहे. या ग्रहाला जे काही होते ते मानवी प्रणालीत एक हजारपटीने अधिक होते. एवढेच की, ते अनुभवण्यासाठी आणि त्याचा उपयोग करून घेण्यासाठी थोडीशी संवेदनशीलता आणि ग्रहणक्षमता लागते.

बरेच लोक नकळतपणे त्याचा वापर करीत आहेत, त्यांना ते काय करत आहेत हे माहीत नाही. नकळतपणे, ठराविक दिवशी ते विशिष्ट प्रकारे वागतात. प्रत्येक माणूस, त्याने आयुष्यात कर्तृत्वाची कोणतीही पातळी गाठली असली तरीही, एक महान खेळाडू असो, कलाकार, संगीतकार, राजकारणी किंवा विचारवंत, जे काही असू शकतात, ते काही अज्ञात कारणास्तव काही दिवशी आणि काही वेळेस उत्तमरीत्या कार्य करतात आणि काही अज्ञात कारणास्तव ते इतर दिवशी त्याच गोष्टी तितक्या चांगल्यारीतीने करत असल्याचे दिसत नाही. याचे कारण आपला ग्रह आणि सौर मंडळाची संरचना तुमच्यावर प्रभाव टाकत आहे.

उत्तरायण आणि दक्षिणायणाचा मानवी प्रणाली कशी कार्य करते, यावर प्रचंड प्रभाव पडतो. त्यानुसार, आध्यात्माच्या मार्गावरील लोक त्यांच्या कार्याचा कल बदलतात - जेव्हा सूर्य उत्तरेकडून प्रवास करतो, तेव्हा ते एका प्रकारे असतात, जेव्हा तो दक्षिणेच्या बाजूने सक्रिय होतो तेव्हा ते वेगळ्या प्रकारे असतात. मानवी शरीरात, एक विशिष्ट पातळीची तीव्रता आणि संवेदनशीलता निर्माण केली गेल्यास ते स्वतःच एक परिपूर्ण विश्व आहे. बाहेरील जगात घडणारी प्रत्येक गोष्ट सूक्ष्म मार्गाने शरीरात प्रकट होत असते. हे प्रत्येकाबरोबर घडत आहे, एवढेच की, बहुतेक लोकांना हे लक्षात येत नाही. परंतु बाहेरील बदलांबद्दल जागरूक झाल्यास आणि मानवी प्रणालीत जे बदल होतात त्यांच्याशी ते एकरूप केल्यास मानवी यंत्रणेची अधिक संघटित आणि हेतुपूर्वक पुनर्रचना केली जाऊ शकते. तुम्हाला या हाडामासाच्या देहात वैश्विक देहाचे स्वरूप आत्मसात करायचे असल्यास उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या या संचलनाशी समन्वय साधणे आवश्यक आहे.

loading image