इनर इंजिनिअरिंग : स्वपरिवर्तनाची पाककृती

Sadguru
Sadguru

शंकरन पिल्लईची बायको एके दिवशी त्याच्यावर भयंकर रागावली होती. त्यामुले तिने सूप बनवले आणि त्यात पाच चमचे जास्त तिखट घालून त्याला वाढले. सूप अतिशय तिखट होता आणि तिला पाहायचे होते, काय होईल. तो पेपर वाचत होता. मग ती म्हणाली, ‘सूप तयार आहे.’ ती परत पर तेच म्हणाली.  तो म्हणाला, ‘‘हम्म, हम्म, हम्म...’’ आणि पेपर वाचतच राहिला.

तिला बघायचे होते एवढे तिखट पुरेसे नाही का... तिने विचार केला, ‘मीच बघते.’ तिने एक चमचाभर सूप घेतले आणि प्यायली. त्या सुपाचा तिच्या तोंडात अक्षरशः स्फोट झाला. डोळ्यांत पाणी आले आणि अश्रू वाहायला लागले. अगदी त्याच वेळी  शंकरन पिल्लईने पेपर खाली ठेवला. त्याने विचारले, ‘‘तू का रडतेस?’’  ती म्हणाली, ‘‘तुला माहीत आहे ना, माझी आई मागच्याच वर्षी गेली आणि तिला हे सूप किती आवडायचे? मी सुपाची वाटी पाहिल्यावर मला तिची आठवण आली आणि रडू आले.’’ ‘‘ओह, असं आहे का? काळजी करू नको. आपण सगळेच कधीतरी आपल्या आईला आणि वडिलांना गमावतो. ठीक आहे.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शंकरन पिल्लईने सूप पीत परत पेपर वाचायला सुरुवात केली आणि पेपर वाचताना सूप प्यायला. आता त्याच्या तोंडात डायनामाईटसारखा स्फोट झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याची बायको म्हणाली, ‘‘ओह, तूसुद्धा माझ्या आईबद्दल भावुक झालास!’’ तो म्हणाला, ‘‘नाही नाही, मी तुझी आई गेली म्हणून रडत नाहीये. ती आपली सुटका करून गेली आणि तुला इकडे ठेवले म्हणून मी रडतोय!’’

हा काही जगण्याचा मार्ग नाही. तुम्ही जिवंत असताना लोकांना तुमच्या अवघ्या उपस्थितीतून आनंद झाला पाहिजे. तुम्ही मेल्यावर त्यांना तुमची आठवण आली पाहिजे. उलट घडल्यास आपण चुकीच्या मार्गाने जगलो. कदाचित तुम्हाला सगळे एकत्र आणि एकदम सोडून देणे शक्य नसेल, तुमच्या सगळ्या मर्यादा, तुमचे पूर्वाग्रह आणि तुमचा मूर्खपणा जो तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्रासदायक ठरतो वगैरे. पण तुम्ही किमान एका गोष्टीपासून सुरुवात करू शकता. यातली किमान एक गोष्ट  जायला हवी, कारण परिवर्तनाशिवाय तुम्ही फक्त आध्यात्माबद्दल फक्त बोलत राहिलात आणि आध्यात्मिक असल्यासारखे सोंग केलेत, तर हे काहीही उपयोगाचे नाही. कृपा करून तुमच्यात थोडेफार परिवर्तन घडवून आणा, जेणेकरून लोकांना तुमच्यासोबत असण्यात आनंद वाटेल आणि तुम्ही मेल्यावर त्यांना तुमची आठवण येईल.. तुम्ही असे जगणे अपेक्षित आहे. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com