esakal | इनर इंजिनिअरिंग : योग : दैवत्वात विलीन होण्याची शिडी
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : योग : दैवत्वात विलीन होण्याची शिडी

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

एका आध्यात्मिक साधकाला इतरांपेक्षा अधिक त्रास सहन करावा लागतो कारण त्याला अज्ञानाच्या वेदना माहीत असतात. जगातील बहुतेक लोकांना अज्ञानाच्या वेदना माहितच नसतात. तुम्हाला अज्ञानाच्या वेदना माहित नसल्यास तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती असाल, की जो पिझ्झा खाऊन आनंदी आहे आणि त्यानंतर तुमच्यात खरोखर कोणतीही इतर ओढ उरत नाही... मी असे म्हणत नाही, की तुम्ही पिझ्झा खाण्याचा आनंद घेऊ नये, फक्त एवढेच, की तुम्हाला तुमचे आयुष्य पिझ्झा खाल्ल्याने, झोपल्याने आणि या किंवा त्या सुखात लिप्त राहून परिपूर्ण वाटत असल्यास तुम्हाला अद्याप अज्ञानाच्या वेदना कळलेल्या नाहीत.

अज्ञानाच्या वेदनेने तुमची आतून चिरफाड केली पाहिजे, तरच जाणून घेण्याची ओढ तीव्र होईल. जाणून घेण्याची ओढ तीव्र झाल्यावर ते केवळ क्षणात घडू शकते. ते इतक्या लांब, दुर्मिळ आहे, असे वाटण्याचे फक्त हेच कारण आहे की अद्याप आवश्यक ती ओढ निर्माण झाली नाही – ती चालू आणि बंद होत राहते. ओढ इतकी तीव्र झाली की, ‘जोपर्यंत मी जाणून घेत नाही तोपर्यंत मी झोपू शकत नाही, मी काही खाऊ शकत नाही, मी श्वास घेऊ शकत नाही,’ ती ओढ अशी झाली, की मग फक्त एका क्षणातच तुम्ही ते जाणून घ्याल. कारण तुम्ही जे काही शोधत आहात ते कुठे डोंगरावर बसलेले किंवा वर ढगांमध्ये तरंगत नाही, ते तुमच्या आतच आहे. येशू ख्रिस्तांनी म्हटले आहे, ‘देवाचे राज्य तुमच्या आतच आहे.’ जर तो

कुठेतरी वर स्वर्गात असला असता आणि तुम्हाला तिथे जाण्याची काहीच काळजी नसती किंवा तुम्ही इथे राहूनच ठीक असते, तर मग ठीक आहे. पण देवाचे राज्य तुमच्या आत असूनही तुम्ही त्याला मुकाल, तर ती एक फार मोठी शोकांतिका आहे, नाही का? ते अगदी इथेच आहे आणि तरीही लोक त्याला मुकतात.

मी योगाचे वर्णन नेहमीच एक दैवत्वाकडे घेऊन जाणारी शिडी म्हणून केले आहे. आपण त्याकडे या दृष्टीने पाहूया. समजा तुम्ही नेहमीच एका ५० एकर जागेत राहत असाल, ज्याच्याभोवती एक मोठी भिंत आहे. सुरुवातीला, भिंत पुरेशी मोठी असेल, तर तुम्हाला सर्व काही ठीक आहे असे वाटते. तुम्हाला अगदीच छान वाटते. पण मग अचानक, तुम्ही वर पाहता, आणि पक्षी आणि वारा त्या ५० एकरापलीकडे जात असल्याचे दिसते.

तुमच्यात असे काहीतरी आहे ज्याला हे पाहून वेड लागते. तुमच्या सभोवतालचे लोक जे समजूतदार असल्याचा दिखावा करतात – तथाकथित संसारी जगातले शहाणे लोक – ते तुम्हाला सांगतील, ‘असला मुर्खपणा बंद कर, फक्त तेच कर जे तुला करायचे आहे, अशी अवास्तव स्वप्ने बाळगू नकोस.’ पण तुम्ही ते दाबू शकत नाही. जर तुम्ही ते दाबले आणि जर ते व्यक्त झाले नाही, तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. जर ते व्यक्त होण्याला मार्ग मिळाला, तर तुम्हाला आणखी जास्त त्रास होईल.

आपण करावे तरी काय? आपल्याला एक शिडी निर्माण करण्याची गरज आहे. एखादी शिडी योगायोगाने निर्माण होऊ शकत नाही. तुम्हाला शिडी बांधण्याच्या एका तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि हा सर्व योग आहे त्याच्याचबद्दल आहे : केवळ एक अशी शिडी बांधायची जिथून तुम्ही हळूहळू एकेक पायरी वर जाऊ शकाल. दररोज, तुम्ही तुमचा योग सराव करा आणि तुम्ही पाहाल, तुमच्या जीवनाच अनुभव आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता हळूहळू बदलेल, अगदी तुमच्या नकळत. हळूहळू, एकेक पायरी ते बदलेल आणि तुम्हाला तिथे पोहोचवेल.

loading image