esakal | इनर इंजिनिअरिंग : जगण्यासाठी तुम्हाला देवाची गरज नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : जगण्यासाठी तुम्हाला देवाची गरज नाही!

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

जे काही तुम्ही देव म्हणून पाहता, देवाबद्दलची कल्पना तुमच्या मनात आली आहे, ती केवळ आपण आपल्या सभोवताली सृष्टी पाहिली आहे म्हणून. ही सृष्टी आहे म्हणून आपण एक सृष्टीकर्ता आहे, असे मानले आहे. देव एक महान सृष्टीकर्ता आहे. तुम्ही ज्याला देव म्हणून पाहता, तो सृष्टीचा मूळ स्रोत आहे. सृष्टीच्या मूळ स्रोताने आपल्याला पंगू बनवलेले नाही, त्याने एक विलक्षण काम केले आहे. पण आता फक्त त्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. तुम्हाला हे व्यवस्थापन सृष्टीकर्त्याच्या हाती सोडायचे असल्यास तो त्याच्या पद्धतीने ते हाताळेल, त्याची रूपरेषा जशी असेल त्यानुसार. पण तुम्हाला जे पाहिजे ते हे नाही, तुम्हाला हवे आहे की जीवन तुमच्या इच्छेनुसार घडायला हवे.

आता उदाहरणार्थ, समजा तुम्ही सर्वजण इथे पुढील विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे खेळाडू आहात असे म्हणू. आणि मी तुमचा प्रशिक्षक आहे. तर पुढील चार वर्षे, जे काही तुम्हाला फुटबॉलबद्दल माहिती होणे गरजेचे आहे ते तुम्हाला शिकवले जाते. फुटबॉलबद्दल जे सर्वकाही मला माहीत आहे, ते सर्व तुमच्यात अनेक मार्गांनी उतरवले जाते. आता सामना खेळण्याची वेळ आली आहे, तुम्ही मैदानावर आहात आणि चेंडू तुमच्या पायाजवळ येतो, पण तेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहता- तर हे चांगले नाही. तुम्ही ते फुटबॉल प्रशिक्षक पाहिले असतील जे बाहेर बसून चिडचिड करत असतात, पण काहीच होत नाही. कारण एकदा का तुम्ही मैदानावर गेलात, की तिथे फक्त तुमचे काम आहे. हे पण तसेच आहे. सृष्टीकर्त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता तुम्ही इथे आहात, हे आता तुम्हाला आणि मला पाहायचे आहे की हे कसे हाताळायचे. आपल्याला हे कसे घडलेले पाहिजे आहे. हे जग कसे ठेवायचे? कसे आणि कोणत्या अवस्थेत आपल्या सर्वांना याचा सर्वोच्च आनंद घेता येईल, हे आपल्याला पाहायचे आहे.

या ग्रहावर तुम्हाला उत्तम आणि सुरक्षित जीवन जगण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी देवाची गरज नाही. यासाठी तुम्हाला अध्यात्मिकतेची गरज नाही. उत्तमरीत्या जगण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणत्याही आध्यात्मिक किंवा दैवी मूर्खपणाची गरज नाही. तुम्हाला फक्त हे हातपाय आणि मेंदूच्या काही पेशी योग्यरीतीने कशा वापरायच्या, हे शिकावे लागेल; मग तुम्ही उत्तम प्रकारे जगू शकाल, फक्त एवढेच. जे लोक हे योग्यरीतीने वापरत आहेत, तेच लोक उत्तमरीत्या जगत आहेत. ही एक वस्तुस्थिती आहे, नाही का? जे लोक वर देवाकडे पाहत आहेत आणि गोष्टी योग्यरीत्या करत नाही आहेत, ते उत्तमरीत्या जगत आहेत का? नाही. भारत हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहे. तेहतीस कोटी देव आणि तरी ५०% लोक पोटभर जेवू शकत नाहीत! हे आपल्यामध्ये काम करू शकले नाही, याचा हा पुरेसा पुरावा नाही का? तुम्ही तुमचे मन आणि शरीर प्रभावीपणे वापरायला शिकलात तर तुम्ही उत्तमरीत्या जगू शकाल.

देवाच्या नावाखाली, आपण आपली मानवतादेखील गमावली आहे. मला वाटते, आता वेळ आली आहे, लोकांनी देवाबद्दल बोलणे बंद करून मानवाला कसे समृद्ध करता येईल याकडे पाहिले पाहिजे. जेव्हा तुमची मानवता ओसंडून वाहू लागेल तेव्हा, देवत्व अपोआप प्रकट होईल. हे तुमच्या बाबतीत घडलेच पाहिजे, त्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही.

loading image