
एखाद्या ठिकाणाचा मानवी प्रणालीच्या सखोल कार्यांवर निश्चितपणे परिणाम पडतो. इतर प्रत्येक जीवनाबाबतही हे खरे आहे.
इनर इंजिनिअरिंग : स्थानिक अन्नच कल्याणाचा मार्ग
शरीराचा आणि जगाचा एक विशिष्ट भाग याचा काही संबंध आहे का? उदाहरणार्थ, जमैकन खूप चांगले धावपटू आहेत. एखादी व्यक्ती जिथे मोठी होते त्या विशिष्ट जागेचा त्यांच्यावर प्रभाव पडतो का? त्यामुळेच स्थानिक अन्न सेवन करावे असे सांगितले जाते का?
एखाद्या ठिकाणाचा मानवी प्रणालीच्या सखोल कार्यांवर निश्चितपणे परिणाम पडतो. इतर प्रत्येक जीवनाबाबतही हे खरे आहे. दक्षिण भारतात अतिशय आरामदायक असलेले वनस्पती आणि प्राणी जीवन न्यूयॉर्कमध्ये असते, तर ते कोमेजून जाईल. कारण इथले जीवन वेगळ्या पद्धतीने विकसित झाले आहे. हे केवळ हवामान आणि सूर्यप्रकाश किंवा थंडीमुळे होत नाही. त्यांचाही मोठा प्रभाव आहेच, पण जीवन एका विशिष्ट प्रकारे का विकसित झाले आहे याचा स्थानाशी काहीतरी संबंध आहे.
हे एक वैज्ञानिकदृष्ट्या जाणले गेलेले सत्य आहे, की जेव्हा एका ठराविक वंशाचे लोक अगदी वेगळ्या भौगोलिक ठिकाणी स्थलांतरित झाले, तेव्हा शारीरिकदृष्ट्या त्यांचे अनेक आनुवंशिक गुण हळूहळू बदलू लागतात. तापमान, हवामान आणि अन्नसेवनाचे स्वरूप यांचाही प्रभाव असतो. पण त्याशिवाय, या पृथ्वीवरील जीवनावर प्रभाव करणाऱ्या शक्ती अक्षांशानुसार बदलतात. शरीराच्या अनेक पैलूंवर याचा परिणाम होतो. जीवनाने एक विशिष्ट आकार आणि स्वरूप धारण केल्यामुळे ते वेगळ्या प्रकारे सक्षम होऊ शकते. भारताचा अक्षांश आणि रेखांश येथील लोकांना मोठ्या प्रमाणात अंतर्मुख करते. याचा अर्थ इतर ठिकाणचे लोक अंतर्मुख होऊ शकत नाही, असे नाही - प्रत्येकजण होऊ शकतो. पण निश्चितपणे, जगाच्या वेगवेगळ्या भागात राहिल्याने, शरीर वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनते. दुर्दैवाने, आपल्यातील प्रत्येक फरक, काही मनुष्य भेदभाव करण्यासाठी वापरतात. अन्यथा, ग्रहाने निर्माण केलेले विविध प्रकारचे मानव आणि जीवसृष्टीचा अभ्यास केल्यास ते फार अद्भुत आहे.
योग्याप्रमाणे अन्न ग्रहण करा
योग प्रणालीत अन्न ग्रहण करण्याची अशी पद्धत आहे. एका दिवसात, तुम्ही जेवढे अंतर चालू शकता, तेवढ्याच त्रिज्येच्या क्षेत्रातून आलेले अन्न तुम्ही सेवन करावे. आपण आपल्यापासून दूरवर पिकवलेले अन्न ग्रहण करू नये, कारण आपले शरीर या धरतीचाच एक भाग आहे. यामुळेच जमिनीच्या संपर्कात राहणे हा व्यक्तीच्या आरोग्याचा आणि कल्याणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ईशा योग केंद्रात आम्ही लोकांना, जर ते निरोगी नसतील, तर त्यांना नेहमी बागेत काम देतो, जेणेकरून ते मातीच्या संपर्कात राहतील.
अन्न एक प्रकारची देवाणघेवाण आहे. जे मातीत होते, ते तुम्ही शरीरात घेत आहात. समजा तुम्ही जमिनीच्या एका भागात राहून स्वतःचे अन्न पिकवून ग्रहण करत असाल, तर थोड्या काळातच तुम्हाला तुमच्या शरीराच्या आरोग्यामध्ये खूप बदल दिसून येतील. याचे कारण असे, की जेव्हा तुम्ही राहात असलेल्याच विशिष्ट भागातून अन्न ग्रहण करता तेव्हा तुमचे शरीर आणि पृथ्वी यांच्यात सतत संवाद होत असतो आणि त्यामुळे शरीर उत्तम प्रकारे कार्य करेल.
Web Title: Sadguru Writes Local Food Is The Way To Welfare
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..