esakal | वाकून बोटांना स्पर्श करताना त्रास होतो? मग 'हे' योगासने करा अन् बघा चमत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षासन

वाकून बोटांना स्पर्श करताना त्रास होतो? मग 'हे' योगासने करा अन् बघा चमत्कार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आपण वाकून आपल्या पायाचे बोटांना स्पर्श करू शकत नाही का? आपल्या शरीराच्या टणकपणाची आपल्याला सवय होण्यापूर्वी योगा करून आपले शरीर आपण लवचिक बनवू शकतो. योगासनांमुळे शरीर लवचिक बनवू शकते. लवचिक लोकांसाठीच योगा असते, असे आपल्याला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहे. खरंतर शरीर लवचिक बनविण्यासाठी योगा करणे ही चांगली संकल्पना आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही योगासने सांगणार आहोत.

वृक्षासन -

आपला योग प्रवास वृक्षासनपासून सुरू करा. याला लवचिक शरीराची गरज नसते. याउलट या आसनामध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. या आसनाचा नियमित सराव केल्यास कुल्हे आणि पायांच्या हाडांचे संतुलन सुधारू शकते. त्यासाठी आपल्या शरीराचे संपूर्ण वजन केंद्रस्थानी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या हातांना समोर ठेवा आणि उजव्या पायावर उभे राहा. आपला पाय धरा आणि श्वास घ्या.

सेतू बंध श्रावणासन -

छाती, मान आणि मणक्यांपर्यंत सर्वच अवयव लवचिक होण्यासाठी हे चांगले आसन आहे. यामुळे थकलेल्या पायांना ऊर्जा मिळते. या आसनाचा आपण दररोज सराव केल्यास आपण केवळ लवचिकता वाढवू शकत नाही तर गुडघा आणि पाठदुखी देखील कमी करू शकता.

हेही वाचा: नागपूरकरांना ना संचारबंदी, ना जमावबंदी, ना कोरोनाची भीती; नागरिक बिनधास्त रस्त्यांवर

अर्ध्य उत्तानासन -

आपल्या मागील भागात टणकपणा असल्यास पुढे वाकणे कठीण आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी आपल्याला पुढील भाग वाकविण्याची सवय करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हा व्यायाम करा.

कैट-काउ पोज

कैट-काउ पोज हा एक व्यायाम असून तो हाड आणि मान यांना लवचिकता आणतो. त्यामुळे ओटीपोट, खांदे बळकट राहतात. तसेच श्वासोच्छवासाच्या देखील चांगला राहतो.

हेही वाचा: 'मेडिकल'च्या किचनमधील कर्मचाऱ्याचाच कोरोनानं मृत्यू

अधोमुख श्वान या अधो मुख शवासन -

ही योग मुद्रा करत असताना आपले गुडघे सरळ ठेवू शकत नाही? पण टेंशन घेऊ नका. तुमचे गुडघे वाकले तर या आसनाचे फायदे तुम्हाला मिळतील.

खुर्ची पोझ किंवा उतासन -

उत्कटासन हे एक आव्हानात्मक पोज आहे जे तुमच्या मांडी आणि पायाचे पायाला मजबूत करते आणि आपल्या पायांच्या स्नायूंना टणक बनविते. लवचिक लोकांसाठी ही एक उत्तम योग मुद्रा आहे. मात्र, तुम्हालाही लवचिक बनायचे असेल तर ही योगमुद्रा नक्की ट्राय करा.

तख्त मुद्रा किंवा फलकसन -

होय, तख्त ही एक योग मुद्रा आहे जे शरीराला लवचिक बनवू शकते. आपण आपले शरीर सरळ ठेवून काही सेकंट लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाय, हात यामध्ये तणाव निर्माण होईल. त्यासाठी स्नायूंना टोनिंग करायला विसरू नका.