हेल्दी फूड : उन्हाळा आणि तब्येतीची काळजी

Drinking-Water
Drinking-Water

उन्हाळा वाढतो आहे आणि पुढील काही दिवसांचा त्याच्या जोरदार झळा जाणवायला सुरवात होईल. या स्थितीत तुम्हाला शरीरातील ऊर्जेचा वेगाने ऱ्हास होत असल्याचा, भूक मंदावत असल्याचा त्रास जाणवतो का... काळजी करू नका, उन्हाळ्यात अनेकांच्या बाबतीत असे घडतेच. उन्हाळ्यापासून बचावासाठी पुढील टिप्सचा उपयोग करा आणि निर्धास्त व्हा. 

हायड्रेशन
पाणी आणि विपुल प्रमाणात पाणी असलेले अन्न घटक शरीरातील ऊर्जेची पातळी वाढविण्यासाठी आणि शरीराचे तापमान वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. टरबूज, ओले नारळ, काकडी आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात आहारात ठेवा. तुमच्या मोबाईल फोनवर रिमांइडर ठेऊन दररोज कमीत कमी 7 ते 9 ग्लास पाणी शरीरात जाईल हे सुनिश्चित करा.

सकाळचा व्यायाम 
सूर्योदयापूर्वी उठल्यास तुम्हाला तुमचा दिवस खूप आधी सुरू करणे शक्य होते. सकाळी भरपूर व्यायाम करून दिवसाची सुरवात करा. दिवस उजाडून उन्हे पडल्यावर व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील उष्णता वेगाने कमी होते. त्यामुळे तुम्हाला व्यायाम टाळण्यासाठीचे कारण मिळते आणि तुम्ही व्यायाम करणे टाळता. तसे होऊ देऊ नका. 

पौष्टिक अन्न घ्या 
या उन्हाळ्यात कोणतेही फॅड डाएट करू नका. योग्य आहार घ्या आणि तुमची ऊर्जेची पातळी योग्य राखा. ती तुम्हाला हवी तेवढी राहील याची काळजी घ्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आहार हलका व टप्प्याने घ्या
एकाच वेळी खूप जेवण करणे टाळा व विशेषतः दुपारचे जेवण खूपच हलके ठेवा. मोठ्या प्रमाणावर कार्बोहाड्रेट्स असलेले जेवण घेतल्यास तुम्हाला संपूर्ण दिवसभर आळसावलेले व झोप येत असल्यासारखे वाटेल.

स्थानिक अन्नपदार्थ घ्या
आंब्यांचे सीझन सुरू होतो आहे, आंबे नक्की खा. मात्र, तुमच्या शरीरात फळांद्वारे येणारी साखर प्रमाणात राहील याची काळजी घ्या 

अती पेयपान टाळा 
प्रत्येकालाच उन्हाळ्याच्या दिवसांत आनंद साजरा करणे आवडते, मात्र मित्रांबरोबर पार्टी करताना अल्कोहोल असलेल्या पेये प्रमाणात घ्या. अति पेयपान केल्यास तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. उन्हाळ्यात अल्कोहोल घेतल्यास घाम आणि लघवीमुळे तुमच्या शरीरातील पाणी वेगाने कमी होते व ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com