esakal | हेल्दी फूड : लॉकडाउनमधील वजनातील वाढ आणि आरोग्य
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Food

हेल्दी फूड : लॉकडाउनमधील वजनातील वाढ आणि आरोग्य

sakal_logo
By
शौमा मेनन

लॉकडाउनच्या काळात आपण सर्वजण घरात अडकून पडलो आहोत आणि या काळात वजन वाढणे नैसर्गिकच आहे. गेल्या वीस दिवसांच्या काळात हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी नक्की कोणते डाएट पाळावे, याबद्दलचा तुमचा गोंधळ उडालेला असणार या शंकाच नाही. मात्र, दुर्दैवी सत्य असेच आहे, की या काळात डाएट पाळणे हे तुम्ही तुमच्या शरीरासाठी करीत असलेली सर्वांत वाईट गोष्ट आहे! कोरोनाचा संसर्ग आजूबाजूला वेगाने पसरत असताना व हवेतून तो तुमच्या जवळ पोचण्याची भीती कायम असताना तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी अत्यंत चांगल्या ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या जेवणात वाढलेले साखरेचे प्रमाण तुमची प्रतिकारशक्ती वेगाने कमी करू शकते. या कोणताही व्यायाम होत नसलेल्या काळात तुमच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स देत आहे. त्या तुमचे वजन नियंत्रित ठेवणे व तब्येत चांगली ठेवण्यात नक्कीच मदत करतील.

हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'

  • आहारातील धान्याचे प्रमाण कमी करा. त्यातून तुमच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या कार्बोहाड्रेट्सचे प्रमाण कमी होईल. तांदूळ आणि गहू आहारात कधीतरीच ठेवा, ते तुमच्या आहाराचे प्रमुख घटक नकोतच. अगदीच आवश्यक असल्यासच या धान्यांचा आहारात समावेश करा.

  • दररोज ४५ मिनिटे शक्य असलेला कोणताही व्यायाम करा.

  • ही वेळ केवळ तुमच्यासाठीच राखीव ठेवा.

  • आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तुम्ही केटो डाएटवर आहात हे कारण देऊन सफरचंदाचा आहारातील समावेश टाळणे या काळात योग्य नाही. तुमच्या शरीराची कार्यशक्ती वाढविण्यासाठी या काळात तुम्हाला मायक्रो न्यूट्रियंट्सची मोठी आवश्यकता आहे.

  • दररोज एका नारळाचे पाणी प्या. यातून तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्चे प्रमाण वाढेल

  • आहारात प्रोटिन्सचा भरपूर समावेश करा. प्रोटिनचे आहारातील प्रमाण तुमच्या शरीराच्या एक किलो वजनासाठी १.५ ग्रॅम असावे.

  • शेवटी महत्त्वाचे, घरातच राहा आणि संसर्गापासून स्वतःला वाचवा. आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू आणि पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सुरवात करू, या अपेक्षांसह.

loading image