
नागपूर : पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध होतात. काही रानभाज्या असतात. पावसाळा सुरू झाली की लगेचच उगवायला सुरुवात होते. सहज मिळणाऱ्या भाज्या अत्यंत चविष्ट असतात. सहज मिळणाऱ्या आणि अनेक भाज्यांना पर्याय असलेली भाजी म्हणजे शेवग्याची (Moringa oleifera) भाजी. ही भाजी अत्यंत चविष्ट आणि पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत गुणकारी आणि औषधी असते. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियामध्ये पोषक घटक असतात. (Shevaga-is-very-beneficial-in-rainy-days)
शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक उष्ण, आद्र्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व आहेत. जीवनसत्व अ, ब आणि क, खनिज विशेत: लोह आणि सल्फर, सिस्टेनाइन, अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकार घटक असतात. त्यामुळे शेवग्याचा विविध भागांचा वापर तीनशेपेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
हृदयासाठी, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य राहण्यासाठी, मुक्त घटकांचे विषारीपण कमी करण्यासाठी शेवग्याचा वापर होतो. दाह कमी करणाऱ्या अवयवांना मदत करतो. तसेच रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी असलेले प्रमाण वाढवते. प्रतिकारक क्षमतेला साह्य करते. डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी, मेंदूच्या कार्यक्षमता आणि हाडांच्या आरोग्यासाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे. कुपोषण, अशक्तपणा कमी करण्यासाठी, स्ननदा मातांच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी, मेनापॉजच्या काळातील नैराश्य यावरही शेवगा उपयुक्त ठरतो.
एन्टीसेफ्टीक म्हणूनही वापर
शेवग्याच्या पानाच्या रसाच्या सेवनाचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शेवग्यचा पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत होते. शेवग्याच्या पानाचा रस मधुमेह असणाऱ्या व्यक्तीचे ग्लुकोजची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. शेवग्याच्या पानाचा रस त्वचेसाठी एन्टीसेफ्टीक म्हणून वापरला जातो.
पानांची भाजी
शेवग्याची पान, फूल, फळ, बिया, साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टीचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो. शेवग्यांच्या पानांची भाजी सेवन केल्याने आतड्यांना उत्तेजन देऊन पोट साफ करते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. तसेच आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत
शेवग्याचे पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी होते. तसेच शरीरावर सूज आल्यास ती कमी करण्यासाठी शेवग्याचा पाल्याचा उपयोग होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे कुठलेही आजार उद्भवत नाही. शेवग्यामुळे शरीराची रक्तशुद्धीकरण व्यवस्तीत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
अस्थमावार औषधाचे काम
शेवग्याच्या शेंगाच्या सूप पिल्याने ब्राँकायटिसचा त्रास कमी होतो. शेवग्यामध्ये असलेले नियासिन, रायबोफ्लॅविन, फॉलिक एसीड व बी कॉम्पलेक्स जीवनसत्वे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. शेवग्याचा पानापासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधचे काम करते. मुतखडा तसेच हृदयरोग, कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.
(Shevaga-is-very-beneficial-in-rainy-days)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.