
तुमचे मन जसजसे उमलायला लागेल तसतसे नवीन ज्ञान तुमच्यात उभारून यायला लागेल. सर्व प्रकारचे ज्ञान चेतनेमध्ये साठविलेले असते.तुमचे मन कुठे कुठे जाते?ते सौंदर्याकडे,प्रकाशाकडे आणि शक्तीकडे आकर्षित होते...
चुकीच्या कामामुळे किंवा त्यांच्यातल्या उणिवांमुळे तुम्ही जेव्हा संतापता किंवा अस्वस्थ होता, तेव्हा इतरांना तसे करण्यापासून तुम्ही परावृत्त करू शकता का? हा विचार आधी करा. नाहीतर तुम्ही तुमचे मन अशुद्ध करून टाकाल. निदान तुमच्या मनाला तरी व्यवस्थित सांभाळा. इतर लोक चुकीच्या मार्गाने वाटचाल करत आहेत म्हणून तुम्ही तुमच्या मनाचा तोल ढासळू का देता? बरोबर? म्हणूनच श्रीकृष्णाने सांगितले आहे ‘‘इतर लोक झोपलेले असताना योगी जागा असतो.’’ तुम्ही झोपलेले असता म्हणजे इतरांचा कचरा तुम्ही स्वीकारत असता. पण ‘‘योगी’ ते होऊ देत नाही. तो जागृत असतो, तो आपले मन ताजेतवाने आणि स्वच्छ ठेवतो.
तुमचे मन जसजसे उमलायला लागेल तसतसे नवीन ज्ञान तुमच्यात उभारून यायला लागेल. सर्व प्रकारचे ज्ञान चेतनेमध्ये साठविलेले असते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तुमचे मन कुठे कुठे जाते? ते सौंदर्याकडे, प्रकाशाकडे आणि शक्तीकडे आकर्षित होते... श्री कृष्ण म्हणतात, ‘‘तुमचे मन जेथे जाईल तेथे मला बघा.’’ एखादी गोष्ट सुंदर असते, म्हणजे त्यातली चेतना उभारून आलेली असते. ती सुंदर असते. असा विचार केल्यामुळे मन परत चेतनेकडे वळेल. श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘सूर्याचा प्रकाश मी आहे. पाण्यातली द्रवता मी आहे, जमिनीतला सुगंध मी आहे. अग्नीतला अग्नी मी आहे.’’
सूर्य ज्या पदार्थापासून बनलेला आहे त्याच पदार्थांपासून आपण बनलेले आहोत. सूर्य नसेल, तर पृथ्वीचे अस्तित्व राहणार नाही आणि पृथ्वीचे अस्तित्व संपल्यावर पर्यायाने तुम्ही सुद्धा या जगात राहणार नाही. क्वांटम फिजिक्सच्या शास्त्रज्ञाशी तुम्ही बोलल्यास तो सुद्धा हेच म्हणेल. ‘‘या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही एकाच लहरीतून निर्माण झालेली आहे.’’
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
श्रीकृष्णाने तेच सांगितले आहे, ‘‘प्रत्येकातली सचेतना मी आहे.’’ तुमचे मन अंतर्मुख करा आणि तुमच्यातल्या त्या जैविक ऊर्जेकडे नीट बघा. म्हणजे ती चेतना मीच आहे याची जाणीव तुम्हाला होईल. जीवन हाच ईश्वर आहे. ईश्वराचे अस्तित्व कुठेतरी बाहेर नाही, ती चेतना शक्तीच ईश्वर आहे.
या शरीरातला जिवंतपणा हाच ईश्वर आहे. मग मन कसल्या आसक्तीच्या मागे पळत आहे? ते कधी एका सुखाच्या मागे लागते, तर कधी दुसऱ्या सुखाच्या मागे पळत असते. म्हणूनच जीवनाकडे लक्ष द्या. माझ्यातच ईश्वर आहे असे नाही, तर तो सर्वत्र आहे. सगळीकडे सारखाच आहे, त्या आत्मरूपी ईश्वराकडे लक्ष द्या. ईश्वरी तत्त्वात मनाला विश्रांती घेऊ द्या...
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा