
Side Effects of Headphones : हेडफोनचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. खासकरुन तरुण वर्गाचा हेडफोन हा एकप्रकारे मित्रच बनला आहे. प्रत्येक ठिकाणी हेडफोनचा वापर करणे आजकाल सवयीचं झालं आहे. मात्र, हा मित्रच आता तुमच्या आरोग्याचा शत्रू ठरु शकतो. कारण जर तुम्ही हेडफोनचा अधिक वापर करत असाल, तर तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण देऊ शकता. एका अध्ययनातून अशी माहिती समोर आली आहे की, हेडफोनचा अधिक वापर करण्यामुळे ऐकण्याची क्षमता घटते. कधी कधी तर हा आजार इतका वाढत जातो की लोकांना डॉक्टरकडे जाण्याची वेळ सुद्धा येते. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की तुमच्या दैनंदिन वापरातील तुमचा हेडफोन आपल्या आरोग्यासाठी कसा धोकादायक बनू शकतो.
1. कँसरसारख्या आजारांचं ठरु शकतो कारण
जर तुम्ही फंगल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीचा हेडफोन वापरलात, तर तुम्हाला देखील फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. हे पुढे जाऊन कँसरचे रुप धारण करु शकते. यामुळे जर आपण कमीतकमी आणि स्वत:चा हेडफोन वापरत असाल तर आपण याप्रकारच्या आजारापासून वाचू शकता.
2. ऐकण्याच्या क्षमतेत होऊ शकते घट
मोठ्या प्रमाणावर हेडफोनचा वापर केल्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे वेळेनुसार व्यक्तीच्या ऐकण्याची क्षमता घटत जाते. अशा पार्श्वभूमीवर जर तुम्ही हेडफोनचा वापर कमी केलात, तर तुमची समस्या दूर होऊ शकते.
3. संक्रमणाचा धोका
मोठ्या प्रमाणावर हेडफोनचा वापर केल्यामुळे कानात हवेचे खेळणं मर्यादीत होतं. यामुळे कानात संक्रमण होण्याचा धोका वाढतो. अनेकवेळा हा धोका इतका वाढतो की आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो.
4. कान सुन्न होणे
मोठ्या प्रमाणावर कानात हेडफोन घातल्याने कान सुन्न होण्याची समस्या उद्भवू शकते. कान सुन्न झाल्याने आपल्याला काहीवेळेपर्यंत कसलाही आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे आपण जर हेडफोनचा वापर कमी केलात तर आपण ही समस्या दूर करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.