अशी घ्या चेहऱ्याची काळजी!

टीम ईसकाळ
Thursday, 24 September 2020

चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठी जाणून घ्या हे सोपे घरगुती उपाय

नागपूर : सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज असते. कधी कधी चेहऱ्यावर बारीक पुरळ पण येतात. जास्त ताण, झोप पुरेशी न होणं किंवा एखाद्या वस्तूंची ऍलर्जी असल्यास बारीक पुरळ येते. चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठी जाणून घ्या हे सोपे घरगुती उपाय

*सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. कोणतेही साबण, फेसवॉश न वापरता केवळ पाण्याने चेहरा धुवावा. असे नियमित करावे. थोड्याच दिवसात आपणास फरक जाणवू लागेल. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.

* चेहऱ्यावर आईस क्यूब चोळावे, असे केल्याने त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते. तरुण राहते. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरच्या बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
* चेहरा सकाळी थंड पाण्याने धुतल्याने त्वचा तजेल होते आणि ज्यामुळे रक्त प्रवाह तीव्र होतो आणि चेहऱ्यावर चकाकी येते.

* स्टीम किंवा वाफ घेतल्यानंतर चेहरा थंड पाण्याने आवर्जून धुवावा. असे केल्याने रोमछिद्र बंद होतात.

* त्वचेला सन बर्नचा त्रास होत असल्यास, दररोज सकाळी चेहरा थंड पाण्याने अवश्य धुवावा. शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा आवर्जून करावं. असे केल्यास सूर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्ती मिळेल आणि त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर टवटवीतपणा येईल.

घरीच तयार करा प्रायमर

मेकअपमध्ये प्रायमरची जागा खूप महत्त्वाची असते.

प्रायमरच्या मदतीने मेकअप बेसला गुळगुळीत करू शकतो, त्याचबरोबर दीर्घकाळ मेकअप टिकून राहण्यासाठी प्रायमर आवश्यक आहे.

बाजारपेठेतील प्रायमर सूट होतं नसल्यास घरात तयार केलेले प्रायमर वापरू शकता.

सविस्तर वाचा - ‘रब ने बनाई जोडी’ची फेसबुकवर धूम! कपल चॅलेंज’ होतेय व्हायरल

कोरफड एक नैसर्गिक प्रायमरचे काम करतं. आपण कोरफडीची जेल मेकअप करण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्यावर लावावी. या नंतर मेकअप सुरू करावा. आपणास तर हे माहितीच आहे की कोरफड जेल त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. हे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते.
कोरफड जेल आणि मॉइश्चरायझर समप्रमाणात मिसळून आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी लावून घ्यावे. हे देखील एक उत्तम प्रायमर आहे.
कोरफड जेल आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब आणि थोडं फाउंडेशन या तिन्ही चांगल्या प्रकारे एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. विकतच्या प्रायमरपेक्षाही हे अधिक चांगला रिझल्ट देईल.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: skin care tips