Omicron Symptoms: अंगावर रॅशेस आलेत, सावधान... असू शकतं ओमिक्रॉनचं लक्षण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashes
Omicron Symptoms: अंगावर रॅशेस आलेत, सावधान... असू शकतं ओमिक्रॉनचं लक्षण!

Omicron Symptoms: अंगावर रॅशेस आलेत, सावधान... असू शकतं ओमिक्रॉनचं लक्षण!

राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनचं (Omicron) संकट वाढतच आहे. हे संक्रमण आणि लक्षणांबाबत अजूनही शोध सुरू आहे. ओमिक्रॉनचं रोज नव लक्षण समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात अंगावर पुरळ किंवा रॅशेस येणे उठणे हेही ओमिक्रॉनचं लक्षण असू शकतं, असा खुलासा करण्यात आला आहे.

हेही वाचा: ड्रायफ्रुट्स ठेवतील तुम्हाला Omicron पासून सुरक्षित

skin problem

skin problem

त्वचेवरील लक्षणे

ZOE कोविड लक्षण अभ्यास अॅपनुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्या अनेक लोकांनी त्वचेवर पुरळ येण्याची तक्रार केली आहे. यात दोन प्रकारच्या त्वचा संसर्गाचा समावेश आहे. पहिल्या लक्षणात त्वचेवर अचानक पुरळ उठू लागते. त्याचबरोबर लहान मुरूमांसारखे ते दिसते. त्यावर खूप खाज सुटते. तुमच्या हात किंवा पायाला खूप खाज सुटायला लागते. तर दुसऱ्या लक्षणात घामोळे येऊन ते संपूर्ण शरीरात पसरते. त्याचा कोपर, घुडघे आणि हाता-पायाच्या त्वचेवर जास्त परिणाम होतो.

हेही वाचा: Mental Health Care : नववर्षात करूया मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प

ताप

ताप

ही लक्षणेही असू शकतात

ओमिक्रॉनच्या इतर लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ येण्याव्यतिरिक्त, मळमळ आणि भूक न लागणे ही लक्षणेही दिसतात. सौम्य ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा अशी लक्षणेही दिसून येतात. तसेच, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, स्नायू दुखणे आणि रात्री घाम येणे ही ओमिक्रॉनची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. अशा लक्षणांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास, चाचणी करून घ्यावी.

हेही वाचा: अंजीर खा, वजन कमी करा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top