
जाणून घ्या तुमच्या वयानुसार तुम्हाला किती झोप आवश्यक?
Sleeping cycle age wise: झोप ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण आपण नक्की किती झोप घ्यायला हवी? तुमची झोपेची गरज तुमच्या वयावर अवलंबून असते हे तुम्हाला माहीत आहे का? तसं पाहिलं तर झोपेचा कोणताही परिपूर्ण कालावधी नसतो, तो विविध घटकांवर अवलंबून असतो आणि वय हे त्यापैकी घटक एक आहे. नॅशनल स्लीप फाऊंडेशनने वयानुसार लोकांना किती तास झोपेची आवश्यकता आहे याची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत.
नवजात (०-३ महिने)-
नवजात बालकांना त्यांच्या जलद मानसिक आणि शारीरिक विकासासाठी प्रौढांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते. नवजात बालकांना दररोज झोप 14-17 तासांची झोप आवश्यक आहे.
शिशु (4-11) महिने-
चौथ्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल दिसून येईल. बाळ जास्त वेळ जागे राहील. या कालावधीला 'चार महिन्यांचे प्रतिगमन' असे म्हणतात. या काळात झोप दररोज 12-15 तास असावी.
1-2 वर्षे वयोगटातील बालके-
या वयादरम्यान दररोज साधारणपणे 11-14 तासांची झोप असावी. या वयानंतर बालकांची झोपेची गरज आता हळूहळू कमी होत जाईल. यावेळी त्याने दिवसापेक्षा रात्री जास्त झोपावे.
3-5 वर्षे वयोगटातील बालके-
झोप दररोज 10-13 तास असावी. त्याला प्रत्येक रात्री 10 ते 13 तासांची झोप लागते, ही वेळ हळूहळू कमी होत जाईल.
शालेय वयाची मुले (6-13 वर्षे)-
या वयात दररोज झोप 9-11 तास असावी. या वयात गृहपाठ आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांत मुलं व्यस्त असतात, त्यामुळे झोपण्याची वेळ निश्चित करणे आणि झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या लागू करणे महत्त्वाचे आहे.
किशोरवयीन मुलं (14-17)-
दररोज 8-10 तास झोप असावी. किशोरवयीन मुलांची झोपेची पद्धत अनियमित असते. ते सहसा रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, ज्यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
प्रौढ 1 (18-25 वर्षे) -
झोप दररोज 7-9 तास असावी.
प्रौढ (26-64 वर्षे) -
7-9 तास झोप घेणं आवश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्यास झोपेचं नियमन करण्याशी संबंधित व्हेंट्रोलेटरल प्रीऑप्टिक न्यूक्लियस नावाचा न्यूरॉन्सचा एक समूह तुमचे वय वाढत असताना हळूहळू नष्ट होऊ शकतो.
वृद्ध (65+ वर्षे) -
अनेक वृद्धांना त्यांच्या गरजेपेक्षा कमी झोप मिळते. याचे कारण असे की त्यांना अनेकदा झोपेचा त्रास होतो. वृद्ध लोकांना किमान पाच तासांची झोप आवश्यक असते. परंतु त्यांनाही साधारणपणे 7-8 तासांची झोप आवश्यक असते.
Web Title: Sleeping Cycle Age Wise Know How Much Sleep Is Necessary For You According To Age
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..