कोणत्या दोन गोष्टी श्रृती मराठेला ठेवतात फिट? वाचा श्रृतीच्याच शब्दांत

श्रुती मराठे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - श्रुती मराठे, अभिनेत्री
प्रत्येक व्यक्तीच्या फिटनेसबद्दलच्या व्याख्या वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या शरीरानुसार ही व्याख्या बदलत असते. व्यवस्थित डाएट आणि आठवड्यातील पाच दिवस व्यायाम या दोन गोष्टी मला फिट ठेवण्यास मदत करतात. बारीक-जाड या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्याच नाहीत, कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्याने ते कोणते वळण घेईल हे आपल्याला सांगता येणे कठीणच आहे. मात्र, आपण जसे आहोत, त्यात आपण कसे फिट राहू हे पाहणे अधिक 
आवश्यक आहे. 

घरी असताना मी नियमितपणे जिमला जाते, मात्र कधी चित्रीकरणानिमित्त बाहेर असल्यावर मी चालायला जाते. जिममध्ये असताना मला कार्डिओ करायला जास्त आवडते. आहारात सांगायचे तर, मी रात्रीचे जेवण झाल्यावर काहीच न खातापिता दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण करते. मी असा एकूण १६ तासाचा उपवास करते. हा उपवास मी नियमितपणे करते. माझ्या आहारात वरण, भात, भाजी, चपाती, कोशिंबीर असा पूर्ण आहार असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You !! @nehhapendse

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

फिटनेससाठी आहार आणि व्यायामाची जशी गरज असते तशीच ध्यानधारणेचीही गरज असते. अगदी २४ तास चित्रीकरणात व्यग्र असल्याने कधीकधी प्रचंड स्ट्रेस येतो. अशावेळी देवासमोर किमान दहा मिनिटे बसून ध्यान करणे, हे माझ्यासाठी उत्तम मेडिटेशन आहे. ही स्वतःसाठी मिळणारी दहा मिनिटे मला देवासमोर बसून किंवा प्रवासात असताना गाडीत मिळाली तरी आवडतात.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello #adelaide #australia #holiday

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slim fit shruti marathe maitrin supplement sakal pune today