Slipped Disc : कंबरेच्या मणक्यातल्या डिस्कमधला दाब

slipped disc treatment tips : दीर्घकाळ बसून काम केल्यामुळे मणक्यातील डिस्कवर दाब वाढतो, स्लिप्ड डिस्क व वेदना निर्माण होतात. योग्य आसन, व्यायाम, उभे राहणे व वजन नियंत्रणामुळे प्रतिबंध करता येतो.
slipped disc treatment tips :

slipped disc treatment tips :

sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ- मेंदू आणि स्पाईन सर्जन

‘‘डॉक्टर, गेल्या दोन आठवड्यांपासून उभं राहिल्यावर कंबर आणि पायातून प्रचंड कळा येत आहेत. परवापासून तर उजव्या पायात मांडीपासून आणि पोटरीमधून अशी कळ सुरू झाली आहे की...’’ ​पस्तिशीतील संजय व्यथा सांगत होता. संजय गेली आठ वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो. दिवसाचे बारा-बारा तास एकाच जागी बसून काम करणे हा त्याच्या क्षेत्राचा नित्यनियम! मान, पाठ आणि कंबर एका विशिष्ट अवघडलेल्या स्थितीत, एक हात माऊसवर, तर दुसरा की-बोर्डवर आणि डोळे व मेंदू स्क्रीनवरून यत्किंचितही न हलवता ही मंडळी काम करत असतात. अशा कामामुळे मणक्यामध्ये ताण न आला तरच नवल.

​तपासाअंती आणि एमआरआयमध्ये स्पष्ट दिसले, की, संजयच्या कमरेच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यातील ‘डिस्क’ (चकती) सरकली होती. यालाच आपण वैद्यकीय भाषेत ‘स्लिप्ड डिस्क’ म्हणतो. ही चकती मणक्याच्या आत शिरून पायाकडे जाणाऱ्या नसांवर दाब आणत होती, म्हणूनच त्याला त्या वेदना होत होत्या. ‘मायक्रो डिस्केक्टॉमी’ या दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेने त्याचे दुखणे गेले आणि दोन दिवसांत तो घरी परतला; परंतु हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. ​

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com